Tuesday 16 November 2021

वाहतूक पोलीसांच्या मेहरबानी मुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा खाजगी प्रवासी वाहनाकडून असाही फायदा, वाहतूकीचे नियम धाब्यावर ?

वाहतूक पोलीसांच्या मेहरबानी मुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा खाजगी प्रवासी वाहनाकडून असाही फायदा, वाहतूकीचे नियम धाब्यावर ?


कल्याण, (संजय कांबळे) : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एस टी कर्मचाऱ्यांच्या संपावर अद्यापही कोणताही ठोस निर्णय न झाल्याने संप सुरू आहे. आणि नेमका याच संधीचा फायदा खाजगी प्रवासी वाहतूक करणारे घेत असून यांच्या कडून कोणत्याही प्रकारचे वाहतुकीचे नियम पाळले जात नसून हा प्रवाशांच्या जिवाशी खेळ सुरू आहे. विशेष म्हणजे हे सर्व वाहतूक पोलिसांच्या मेहरबानी वर होत असून काही प्रवासी 'दलाल'ही यामध्ये सामील आहेत.


दिवाळीच्या सुट्टीत अनेक चाकरमानी आप आपल्या गावी गेले असतानाच महाराष्ट्र राज्य मार्ग परीवहन महामंडळ अर्थात एसटीच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारला. खाजगी वाहने, ट्रव्हल्स्, कालीपिली, इको, वडाप या सर्वाच्या अतिक्रमणानंतरही लालपरी अर्थात एस टी टिकून राहिली, आजही ग्रामीण भागात ५० टक्के पेक्षा जास्त प्रवासी हे एसटी वरच अवलंबून आहेत. कल्याण नगर, कल्याण कोल्हापूर, कल्याण नाशिक, कल्याण दापोली, गुहागर, चिपळूण हे मार्ग एसटी साठी हक्काचे उत्पन्नाचे स्त्रोत आहेत. गणपती, व आषाढी एकादशी या काळात कल्याण आगाराला लाखोचे उत्पन्न मिळाले,कोकण विभागात कल्याण आगार टाँप राहिले.


असे सर्व असताना या लालपरिच्या कर्मचाऱ्यांनी राज्य भर संप पुकारला, सुरुवातीला संप मिटेल असे वाटत असतानाच जवळपास २००च्या वर बसडेपो ठप्प झाले, प्रवाशांचे प्रंचड हाल झाले. शासनाने दस्तुरखुद्द मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी अवाहन करुनही कर्मचारी संपावर ठाम राहिले, अशातच भाजपाच्या नेत्यांनी संपात उडी घेतली. त्यामुळे हा संप भाजपाने हायजँक केल्याचे चित्र राज्यात निर्माण झाले. त्यामुळे मग सरकार पण जिद्दीला पेटले, या आधीच्या भाजपा सरकारने का विलिनीकरण केले नाही ? असे आरोप करुन प्रवाशांचे हाल होऊ नये म्हणून खाजगी वाहने, ट्रव्हल्स, वडाप आणि शिवशाही बस रस्त्यावर उतरविले, सुमारे २ हजार गाड्या चालत असल्याचे परिहवन मंत्री अनिल परब यांनी सांगितले.

या सुवर्ण संधीचा बरोबर फायदा खाजगी वाहने, कालीपिली, वडाप, यांनी घेतला, प्रवासी परवान्याच्या डबल, टिबल नव्हे तर चौबल प्रवासी गाडीत कोंबून कोंबड्या बक-यासारखे वाहतूक सुरू झाली. कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, येथे तर नवले ब्रीज च्या पुढे सिंहगड रस्त्यावर "वाहतूक एजंट" खाजगी गाड्या भरत होते, या प्रत्येक गाडीमागे या दलाल याला ५०० रुपये मिळत होते. हा रस्ता आपल्याच मालकीचा आहे असा हा दलाल वागत होता. वाहतूक पोलिसांच्या मेहरबानीने हे सर्व सुरू असल्याचे चित्र दिसत होते. गाडीची नंबरप्लेट, पियूसी, इन्शुरन्स, चालकाचा परवाना, याचा कशाला कशाचा पत्ता नव्हता, आश्चर्य म्हणजे हे सर्व वाहतूक पोलीस उघड्या डोळ्यांनी बघत, मात्र यांना कोणत्याही प्रकारची विचारना होत नव्हती त्यांचेकडून सर्व नियम धाब्यावर बसवले जात होते, तर इतर खाजगी वाहने, मोटारसायकल, याची मात्र कसून चौकशी होत होती. 

"यामागे प्रत्येक ठिकाणी "सेक्शन" असल्याने असे होते असे एका जाणकारांनी सांगितले".

एसटी कर्मचारी यांचा आजचा संपाचा ११वा दिवस आहे, भाजपाने आपली संपूर्ण ताकत पणाला लावून या संपाला पाठिंबा दिला आहे, भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर हे या संपाचे कैवारीच बनले आहे, आतापर्यंत ३००च्या वर कामगारांचे निलंबन केले आहे, अद्यापही तोडगा निघालेला नाही, प्रवांशाची आर्थिक लुट व होणारा मनस्ताप यामुळे संपाला मिळणारी जनतेची सहानुभूती दिवसेंदिवस कमी होत आहे, यांनी जर एसटी कडे पाठ फिरवली तर एसटीचे काय होईल? याचाही विचार व्हायला हवा, राजकारणी राजकारण करतील, पण प्रवासी व तुमचे काय? लुटालूट, हाल त्रास, याला जबाबदार कोण? याचा शासन व कर्मचारी या दोघांनी निर्णय घ्यावा.

No comments:

Post a Comment

कल्याण पश्चिम महायुतीचे उमेदवार आमदार विश्वनाथ भोईर यांचा शेकडो समर्थकांच्या उपस्थितीत अर्ज दाखल !!

कल्याण पश्चिम महायुतीचे उमेदवार आमदार विश्वनाथ भोईर यांचा शेकडो समर्थकांच्या उपस्थितीत अर्ज दाखल !! कल्याण, सचिन बुटाला : राज्या...