Tuesday 16 November 2021

कल्याण शहरातील शहरी गरिबांना BSUP प्रकल्पात घरे मिळवून देण्याचा प्रहार ने घेतला निर्णय - डॉ आदर्श भालेराव "खंडित केलेला पाणीपुरवठा प्रहार मुळे सुरू .साठे नगर वासीयांना दिलासा; साठे नगर परीसरातील नागरिकांन कडून आभार व्यक्त"

कल्याण शहरातील शहरी गरिबांना BSUP प्रकल्पात घरे मिळवून देण्याचा प्रहार ने घेतला निर्णय - डॉ आदर्श भालेराव 

"खंडित केलेला पाणीपुरवठा प्रहार मुळे सुरू .साठे नगर वासीयांना दिलासा; साठे नगर परीसरातील नागरिकांन कडून आभार व्यक्त"


कल्याण, बातमीदार : गरिबांना इमारतीत घरे देण्याची स्वप्ने दाखवत त्यांच्या झोपड्यांवर नांगर फिरवला आता ते बेघर झाल्यानंतर त्यांना  महापालिका प्रशासनाने दाखविला  ठेंगा. गरीब नागरिकांच्या जखमेवर मीठ चोळल्याचा हा प्रकार असल्याने महापालिका प्रशासन  या निर्णयाविरोधात प्रहार जनशक्ती पक्षाने  संताप व्यक्त केला आहे.


कल्याण शहरात साठे नगर येथील मातंग समाज्याच्या नागरिकांचे झोपड्या निष्काशीत करण्यासाठी महापालिका अधिकारी यांनी उपायुक्त घन कचरा रामदास कोकरे याच्या आदेशानुसार झोपड्या निष्काशीत करण्यासाठी पाणी पुरवठा खंडित करण्यासाठी कर्मचारी पाठवून पाणी पुरवठा खंडित केल्याची तक्रार साठे नगर परिसरातील नागरिकांनी  प्रहार जनशक्ती पक्षाचे कल्याण तालुका संघटक डॉ आदर्श भालेराव, समाजसेवक नइम खान याच्या कडे केली असता भालेराव यांनी ठाणे जिल्ह्या अध्यक्ष ऍड स्वप्नील पाटीलजी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रहार जनशक्ती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष संस्थापक कामगार राज्यमंत्री महाराष्ट्र मा. ना. ओमप्रकाश ऊर्फ बच्चू भाऊ कडू याच्या नेतृत्वाखाली खाली साठे नगर परिसरात पालिका प्रशासनाने अनधिकृतपणे खंडित केलेला पाणी पुरवठा सुरू करण्यास भाग पाडले. सदर साठे नगर सहित अनेक शहरी गरीबांना BSUP प्रकल्पता घरे मिळवून देण्यासाठी भारतीय संविधानाच्या मूलभूत अधिकार योग्य पालन व अंमलबजावणी करत घरे मिळवून देऊ असे आवाहन प्रहार तर्फे करण्यात आले. सदर नागरीकांच्या हक्काच्या विरोधात जाणाऱ्या भ्रष्ट अधिकारी याच्यावर भ्रष्टाचार विरोधी कायद्या अंतर्गत कारवाई करण्यासाठी प्रहार मोठ्या प्रमाणात आंदोलन करणार अशी माहिती देण्यात आली . 

कल्याण-डोंबिवली पालिका क्षेत्रात २००७ पासून सुरू असलेल्या बीएसयूपी प्रकल्पातून ७२७२ सदनिका प्रस्तावित करण्यात आल्या असल्या तरी १४ वर्षानंतर केवळ २३०० सदनिका पूर्णत्वास जाऊ शकल्या आहेत. यात १६०० लाभार्थ्यांना सदनिका देण्यात आल्या असून उर्वरित लाभार्थी अद्याप प्रतीक्षेतच आहेत. आता यातील ३२०० सदनिकांवर रेल्वेने दावा केला असून रेल्वेच्या फ्रेट कॉरिडॉर प्रकल्पात बाधित होणाऱ्यांना ही घरे देण्यासाठी रेल्वेकडे ती सुपूर्द करण्याचे निर्देश राज्य शासनाने पालिका प्रशासनाला दिले आहेत. यामुळे गरिबांना घरे देण्यासाठी राबविलेल्या या योजनेत रेल्वेचाच फायदा होणार असून स्थानिक गरीब विस्थापित मात्र उपेक्षितच राहणार आहेत. 


वास्तविक झोपड्या तोडतानाच लाभार्थी निश्चित केले जाणे गरजेचे होते मात्र लाभार्थ्यांची यादी तयार करताना मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला, बोगस लाभार्थ्यांना या यादीत स्थान देत खऱ्या लाभार्थ्यांना मात्र यापासून वंचित ठेवण्यात आल्याचा आरोप केला जात आहे. यामुळेच उंबर्डे येथील सदनिकांमध्ये ६३ लाभार्थ्यांना ताबा दिल्यानंतर साठेनगर झोपडपट्टीमधील इतर नागरिकांनी या प्रकल्पातील बाजूच्याच इमारतीमधील घरांचा जबरदस्तीने घेतला आहे. इतर प्रकल्पाचे काम ८० ते ८५ टक्क्यांवर रखडले असून शासनाकडून ही योजना बंद करण्यात आल्यामुळे हे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी पालिकेच्या तिजोरीतून निधी खर्च करावा लागणार आहे.

आता या प्रकल्पातील ३२०० सदनिका रेल्वेकडून मागण्यात आल्या असून शासनाने या सदनिका रेल्वेला हस्तांतरित करण्याचे निर्देश दिले आहेत. यापूर्वी महासभेने ८४० घरे रेल्वेच्या प्रकल्प बाधितांना देण्यासाठी रेल्वेला विकत देण्यास मंजुरी दिली आहे. यातील ५५४ घरे पालिकेने रेल्वेला हस्तांतरित केली आहेत. ५४५ घरांची ९० कोटी रक्कम पालिकेच्या तिजोरीत जमा झाली असून यातील केंद्र आणि राज्य शासनाचा हिस्सा द्यावा लागणार आहे. सध्या हा सर्व निधी पालिकेने करोना उपाययोजनासाठी वापरला आहे.

*घरे मिळणे कठीण आहे पण प्रहार नागरिकांना घरे मिळवून देणार* 

पालिकेच्या रस्ता रुंदीकरणासह विविध प्रकल्पात बाधित झालेल्या नागरिकांचे बीएसयूपीच्या सदनिकांमध्ये पुनर्वसन करण्याची मागणी महासभेकडून करण्यात आली होती. मात्र बीएसयूपीच्या नियमावलीत ही तरतूद नसल्यामुळे प्रशासनाने केंद्र आणि राज्य सरकारकडे याबाबत मार्गदर्शन करण्याची मागणी करण्यात आली होती. केंद्राने याबाबत राज्य शासनाला निर्णय घेण्याचे निर्देश दिले. राज्य शासनाने ज्या योजनेतील बाधितांना घरे द्यायची असतील त्या विभागाने त्याचा आर्थिक भार उचलावा, असा आदेश दिल्यामुळे प्रकल्पबाधितांना या योजनेत घरे मिळणे कठीण आहे. पण प्रहार जनशक्ती पक्षा तर्फे योग्य भूमिका बजावणार आहे. आज पर्यत BSUP प्रकल्पात झालेल्या भ्रष्टाचार उघड करण्यासठी प्रहार ने मोठी भूमिका घेण्याचं निर्णय घेतला आहे.

आजवरचा प्रकल्पाचा प्रवास :-

बीएसयूपी योजनेखाली २००७ साली केंद्र सरकारची मंजुरी

सात डीपीआरना मंजुरी. जागा ताब्यात नसताना डीपीआर केल्याने चार डीपीआर रद्द

तीन डीपीआरमध्ये ७२७२ सदनिका उभारण्याचे काम सुरू

१४ वर्षानंतरही निम्म्याहून अधिक काम प्रलंबित

मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप

२३०० सदनिकांचे काम पूर्ण, १६०० लाभार्थ्यांना घराचे वाटप

ठेकेदार काम सोडून पळाल्याने प्रकल्प रखडले

३२०० सदनिका रेल्वेला द्याव्या लागणार कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीत BSUP प्रकल्प शहरी गरिबांना घर देण्याची योजना  महा पालिकेच्या भ्रष्ट कामचुकार अधिकाऱ्यांन मुळे असफल ठरली हीच शोकांतिका आहे. 

प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख हितेश जाधव जी ठाणे जिल्हा  अध्यक्ष ऍड स्वप्नील पाटील कल्याण तालुका संघटक डॉ आदर्श भालेराव कल्याण तालुका अध्यक्ष सिध्दार्थ बोराडे तालुका सचिव प्रदीप सोनवणे कल्याण पश्चिम उपाध्यक्ष भोरडे  मोहमद शेख बशीर शेख अस्लम सोयान फिरोज खान नासिर ठानवल  मुस्तक अन्सारी याना घेऊन  योग्य पाठपुरावा करून कल्याण शहरातील हजारो बेघर धारकांना BSUP प्रकल्पात घरे मिळवून देण्याचे निर्णय घेतला आहे.

No comments:

Post a Comment

कल्याण पश्चिम महायुतीचे उमेदवार आमदार विश्वनाथ भोईर यांचा शेकडो समर्थकांच्या उपस्थितीत अर्ज दाखल !!

कल्याण पश्चिम महायुतीचे उमेदवार आमदार विश्वनाथ भोईर यांचा शेकडो समर्थकांच्या उपस्थितीत अर्ज दाखल !! कल्याण, सचिन बुटाला : राज्या...