ST कर्मचाऱ्याच्या आत्महत्येने महाराष्ट्र हादरला ; शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार, सरकार आणखी किती बळी घेणार?' असा सवाल उपस्थित केला जात आहे.
अरूण पाटील, भिवंडी (कोपर) दि. १८ :
महाराष्ट्रभर एसटी कर्मचाऱ्यांच आंदोलन सुरू आहे. अनेक कामगार हे संपावर गेले आहेत. एसटी कामगारांच्या मागण्या घेऊन कामगार आंदोलनं करीत आहेत. त्यात सरकारने संपकरी कामगारांवर निलंबनाच्या कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यामुळे बुलडाणा जिल्ह्यातील माटरगाव येथील विशाल अंबलकार नामक एसटी कामगाराने आपलंही निलंबन होईल या भीती पोटी विषारी औषध प्रशासन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्या वेळी त्याला प्रथम खामगाव आणि नंतर अकोला येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
24 तास मृत्यूशी झुंज देत असलेल्या विशालने शेवटचा श्वास घेतला. त्यामुळे अकोला जिल्हा हादरला. आज त्याच्या पार्थिवावर त्यांच्या गावी माटरगाव येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. घरचा करता पुरुष निघून गेल्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यामुळे सरकार आणखीन किती बळी घेणारा असा सवाल उपस्थित केला जात आहे.
दरम्यान एसटी महामंडळ राज्य सरकारमध्ये विलगीकरण करून घेण्याच्या मागणीसाठी एसटी कर्मचारी आपल्या संपावर ठाम आहे. हायकोर्टाने आदेश दिल्यानंतरही कर्मचाऱ्यांवर हल्ले सुरूच आहे. अशातच एसटी महामंडळाने आता कारवाईचा बडगा उगारला आहे. एकाच वेळी २२९६ रोजंदार कर्मचाऱ्यांना सेवा समाप्तीची नोटीस बजावली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
एसटी महामंडळ आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी कर्मचाऱ्यांना कामावर परत येण्याची विनंती केली होती. पण, एसटी कर्मचारी आपल्या संपावर ठाम आहे. त्यामुळे आता महामंडळाने कारवाईला सुरुवात केली आहे. एसटी महामंडळाने संपा विरोधात मोठं पाऊल उचलले आहे. एकाच वेळी २२९६ रोजंदार कर्मचाऱ्यांना सेवा समाप्तीची नोटीस बजावली आहे. या कर्मचाऱ्यांना २४ तासांचे अल्टीमेटम दिले आहे. कामावर हजर व्हा नाही तर सेवा समाप्त करण्यात येईल, असे प्रशासनानं नोटीसीद्वारे कळवले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
No comments:
Post a Comment