Friday, 3 December 2021

कल्याण तालुक्यातील शाळेचे बेकायदेशीर शुल्कवाढ व शैक्षणिक साहित्यांची बंधनकारक खरेदी विरोधात प्रहार चा जनता दरबार* - *डॉ. आदर्श भालेराव*

कल्याण तालुक्यातील शाळेचे बेकायदेशीर शुल्कवाढ व शैक्षणिक साहित्यांची बंधनकारक खरेदी विरोधात प्रहार चा जनता दरबार* - *डॉ. आदर्श भालेराव*


कल्याण, बातमीदार : लॉकडाऊन संकटात अनेक खासगी शाळांनी फीसमध्ये भरमसाठ वाढ केली होती तसेच फीस न भरणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन वर्गात सामावून न घेणे, आरक्षित जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश न देणे अशा कृत्यांनी विध्यार्थी आणि पालकांचा मानसिक छळ केला होता. लॉकडाऊन Lockdown कालावधीत फी वाढ करणे, पालकांकडे फी भरण्यास तगादा लावणे फी न भरल्यामुळे निकालपत्र रोखून ठेवणे, विद्यार्थ्यांना वरच्या वर्गात बढती न देणे, फी न भरल्याने शाळेतील विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणातून कमी करणे शाळेने शिक्षण हक्क कायद्यानुसार वंचित आणि दुर्बल घटकातील २५ विद्यार्थ्यांना खासगी शाळेत प्रवेश देणे बंधनकारक असतानाही हे प्रवेश नाकारल्याचे  समोर आले आहे. बेकायदेशीर शुल्कवाढ व शैक्षणिक साहित्यांची बंधनकारक खरेदी असा प्रकार कल्याण  शहरातील इंग्रजी, मराठी माध्यमाच्या शाळा चर्चेत असतानाच प्रहार जनशक्ती पक्षाच्या निदर्शनास आले आहे. काही परिसरातील ही इंग्रजी माध्यमाची शाळा मनमानी कारभार करीत असल्याची तक्रार पालकांनी केली आहे. या संदर्भात प्रहार जनशक्ती पक्ष कल्याण तालुका कमिटी तर्फे *महाराष्ट्र राज्य मंत्री शिक्षण विभाग मंत्री महोदय मा. नामदार ओमप्रकाश उर्फ बच्चुभाऊ कडू* यांच्या निर्दशनास आणून देण्याकरिता सदर कल्याण तालुक्यात सुरू असलेल्या मनमानी कारभार व मनमानी कारभार दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासकीय अधिकारी बेजबाबदारीपणा उघड करण्यासाठी *प्रहार जनशक्ती पक्षाचे ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख हितेश जाधव ठाणे जिल्हा अध्यक्ष ऍड स्वप्नील पाटील त्यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण तालुका संघटक डॉ. आदर्श भालेराव याच्या प्रयत्नाने कल्याण तालुक्यात जनता दरबार घेण्याचे ठरवले जात आहे*    

त्याकरिता कल्याण तालुक्यातील सर्व पालकांनी शाळेतील पॅरेन्ट्स असोशिएशनच्या माध्यमाने प्रहार जनशक्ती पक्ष कल्याण तालुका कमिटीकडे  लेखी स्वरूपात तक्रात करावी आता पर्यत पालकानी प्रशासनास केलेल्या पत्रव्यवहार माहिती अर्जा सोबत द्यावी. 

मागील अनेक दिवसांपासून पालकांकडून होत असलेल्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत शिक्षण विभागाने 'महाराष्ट्र शैक्षणिक शुल्क विनयमन अधिनियम' समितीची स्थापना केली आहे. मागील वर्षभरापासून कोरोना महामारीत शाळा बंद असताना सुद्धा शाळांनी फी वाढवल्याचा तर काही शाळांनी फी वसुली करण्याबाबतच्या तक्रारी पालकांकडून शिक्षण विभागाला प्राप्त झाल्या आहेत. मात्र, पालकांनी न्याय मिळावा यासाठी अशाप्रकारची कोणत्याही समितीचा गठन केलेले नसल्याने शासन निर्णय काढून सुद्धा काही शाळांनी फी वाढ केल्याचा आणि मनमानी कारभार सुरू ठेवल्याचा समोर येते होते.

फी वाढीबाबत न्याय मागण्याची तरतूद 'महाराष्ट्र शैक्षणिक शुल्क विनियमन अधिनियम,2011 (2014 चा महा.7) (1)' याद्वारे कायद्याने प्रदान करण्यात आली आहे

सदरच्या समितीमध्ये सेवानिवृत्त न्यायाधिश, शिक्षणक्षेत्रातील तज्ञ अधिकारी यांचा समावेश असून सनदी लेखापाल यांची नियुक्ती केली आहे. सनदी लेखापालाच्या नियुक्तीमुळे शैक्षणिक संस्थेचे आर्थिक व्यवहार तांत्रिकदृष्ट्या तपासण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. त्यामुळे संस्थेच्या मनमानी कारभारावर सुद्धा लक्ष घालता येणार आहे. 

या समितीच्या स्थापनेने ज्या शाळा फी वाढ करतात त्यांच्या विरोधात तक्रार करून पालकांना सुद्धा न्याय मिळणार आहे. शाळांचा ऑडिट सुद्धा होईल जेणेकरून शाळांचा मनमानी कारभाराला चाप बसेल. महत्त्वाचे म्हणजे आता शुल्क नियंत्रण कायद्यामध्ये बदल करावा ही मागणी राहील. कारण शुल्क नियंत्रण कायद्यानुसार 25 टक्के पालक एकत्र येऊन या समितीकडे न्याय मागण्यासाठी जाऊ शकतात. त्यामुळे 25 टक्के पालकांनी एकत्र येणे महत्वाचे आहे. कोणीही वैयक्तिक पालक न्याय मागू शकत नाही.

सर्व पालकांनी व विद्यार्थ्याने पुढे येऊन आपल्यावर झालेल्या अन्यायाविरोधात प्रहार जनशक्ती पक्षाकडे लेखी स्वरूपात तक्रार करावी जेणेकरून सदर तक्रार "महाराष्ट्र राज्य मंत्री शिक्षण विभाग नामदार ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू" यांच्या माध्यमाने मनमानी करणाऱ्या शाळेवर योग्यरीत्या कारवाईसाठी निर्णय घेण्यात यश येईल. कल्याण तालुक्‍यात शिक्षण क्षेत्रात मनमानी कारभार करून पालक व विद्यार्थ्यांची आर्थिक छळ करणाऱ्या शाळेवर आळा बसेल त्यामुळे सर्व पालकांनी व संघटनांनी राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांचा जनता दरबार घेण्यास आपली तक्रार नोंदविण्यास पुढाकार घ्यावा.

तक्रार नोंदवण्याचे स्थळ :-
प्रहार जनशक्ती पक्ष कार्यालय : गाळा नंबर B4 फर्स्ट अवेन्यू बिझनेस पार्क दुर्गाडी चौक साई आरोग्यम हॉस्पिटल शेजारी सीएनजी पंप वाडेकर रोड कल्याण पश्चिम 421301 

तक्रार नोंदविण्याचा कालावधी :-
दिनांक : 7 डिसेंम्बर 2021 ते 10 डिसेंम्बर 2021
सकाळी 11 ते 2   सायंकाळी 4 ते 8 पर्यत 

अधिक माहिती साठी संपर्क साधावा :- 
डॉ. आदर्श भालेराव 8070705552 
प्रदीप सोनवणे  8652696744 
बशीर शेख  +91 98704 61983 
मोहम्मद शेख +91 91675 95140 
अस्लम सोयान +91 92214 39786 
मुस्ताक चौधरी +91 93265 01182 
आजीम साखरकर 9664980328 
सिद्धार्थ बोराडे, +91 89766 44819

No comments:

Post a Comment

शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष घाटकोपर (प.) तर्फे विविध गॅस एजन्सींना भेट देऊन चर्चासह दिले निवेदन !!

शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष घाटकोपर (प.) तर्फे  विविध गॅस एजन्सींना भेट देऊन चर्चासह दिले निवेदन !! युद्धजन्य परिस्थितीमुळे घरगुती गॅस सिलें...