प्रा. जोगेंद्र कवाडे यांच्या हस्ते सम्राट चित्रपटाचा मुहूर्त सोहळा संपन्न !!
कल्याण, बातमीदार :
पीपल्स रिपब्लिकन पार्टी चित्रपट संघर्ष संघटना आणि तारांगण इंटरटेनमेंट हाऊस प्रस्तुत सम्राट चित्रपटाचा मुहूर्त सोहळा पी. आर. पी. चे राष्ट्रीय अध्यक्ष मा. खा. प्रा. जोगेंद्र कवाडे सर यांच्या हस्ते कल्याण येथील शासकीय विश्रामगृहात संपन्न झाला.
यावेळी ज्येष्ठ कलाकार लेखक मंगेश सरदार, चित्रपट अभिनेता अभिजीत चव्हाण, राहुल भारुड, अभिनेत्री आरती जोशी, पिआरपी चित्रपट संघर्ष संघटनेचे महाराष्ट्र राज्य सचिव प्रिया वैद्य, राज्य संघटक संदीप निकुंभ, सचिन सरदार, सचिन कदम उपस्थित होते.

No comments:
Post a Comment