भारतातील विमानतळांवर आता बोर्डिंग पास ऐवजी थेट चेहरा दाखवून प्रवेश मिळवता येणार आहे.!!
भिवंडी, दिं,3, अरुण पाटील (कोपर) : भारतातील विमानतळांवर आता बोर्डिंग पासऐवजी थेट तुमचा चेहरा दाखवून प्रवेश मिळवता येणार आहे. केंद्रीय विमान वाहतूक मंत्रालयाचे राज्यमंत्री जनरल व्ही. के. सिंह यांनी लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना ही माहिती दिली आहे. लवकरच देशातील चार विमानतळांवर प्रायोगिक तत्त्वावर ही प्रणाली राबवण्यात येणार आहे. यामध्ये वाराणसी, पुणे, कोलकाता आणि विजयवाडा या विमानतळांचा समावेश आहे. पुढच्या वर्षी मार्च महिन्यापासून ही योजना प्रायोगिक तत्त्वावर सुरू केली जाणार आहे.
विमानतळावर प्रवेश करताना प्रवाशांना दरवेळी आपली ओळख सादर करावी लागते. त्यामध्ये बराच वेळ जातो आणि दरवेळी कागदपत्रं सोबत बाळगावी लागतात. त्यासाठी आता नवी यंत्रणा विकसीत करण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे. यानुसार बायोमेट्रिक बोर्डिंग सिस्टिमसाठी एक ऍप तयार करण्यात येणार आहे. यामध्ये स्वतःच्या ओळखीचे तपशील, पॅन कार्ड, आधार कार्डाचे तपशील यांच्यासह प्रत्येकाच्या चेहऱ्याच्या बायोमेट्रिकही नोंदवले जाणार आहेत. त्यामुळे प्रत्येकाचा चेहराच हेच त्याचं ओळखपत्र असणार आहे. विमानतळावर प्रवेश करताना कुठलंही कार्ड दाखवण्याऐवजी थेट चेहराच स्कॅन होईल आणि त्या नंतर प्रवाशांना विमान तळावर प्रवेश मिळणार आहे..


No comments:
Post a Comment