Friday, 3 December 2021

दृढ निश्चयाने यश प्राप्ती - संत राजिन्दर सिंह जी महाराज

दृढ निश्चयाने यश प्राप्ती 
-  संत राजिन्दर सिंह जी महाराज


इतिहासातील दंतकथे मध्ये एका कावळ्याची गोष्ट आहे. गरमीचे दिवस होते, एक कावळा पाणी पिण्याकरिता जंगलात भटकत होता. कडक उन्हाच्या कारणाने जवळपास पिण्यासाठी पाणी नव्हते. शेवटी त्याला एक मडके दिसले, ज्याच्या तळाशी थोडेसे पाणी होते. कावळ्याने पाणी पिण्याकरिता आपली चोच मडक्यात घातली. परंतू त्याची चोच तळापर्यंत पोचू शकली नाही. सुरुवातीला त्याला काहीच समजले नाही की त्याने काय केले पाहिजे. त्याला असे वाटत होते की, तो पाणी पिऊ शकणार नाही. तेव्हा त्याला एक उपाय सुचला. 
जवळपास काही खडे पडलेले होते. त्याने एक-एक करून छोटे-छोटे खडे मडक्यात टाकण्यास सुरुवात केली. एक एक खडा पाण्यात पडल्यामुळे मटक्याच्या तळाशी असलेले पाणी थोडे-थोडे वर येऊ लागले. एक-एक करून काही खडे त्याने पाण्यात टाकले. काही वेळ त्याला हे सर्व व्यर्थ वाटत होते. कारण की तो आतापर्यंत पाण्यापर्यंत पोहोचू शकला नव्हता. परंतु बरेचसे खडे पाण्यात टाकल्यावर मडक्यातील पाणी मडक्याच्या तोंडापाशी आले. हे पाहून कावळा फार आनंदित झाला. त्याने पाणी पिऊन आपली तहान भागवली. 
ही अवस्था त्या वेळे प्रमाणे आहे, जी वेळ आपण ध्यान-अभ्यासात व्यतीत करतो. अशावेळी आपल्याला असे वाटते की, वेळ असाच जात आहे आणि आपणाला आपल्या अंतरी कोणतीच प्रगती दिसून येत नाही. सुरुवातीचे काही दिवस आपणास त्याचा परिणाम दिसून येत नाही. परंतु दररोज प्रयत्न केल्याने आपण आपले ध्यान एकाग्र करून लवकरच आपल्या अंतरी दिव्य आत्मिक प्रकाशाचा अनुभव करू लागतो. 
जर आपणाला कोणताच अनुभव होत नसेल तर आपण निराश होता कामा नये आणि कोणत्याही परिस्थितीत हार मानता कामा नये. आपण आपल्या ध्यान-अभ्यासाच्या साधनेत दृढ राहिले पाहिजे. असे केल्याने एक दिवस प्रभूच्या कृपेने निश्चितच अध्यात्मिकते च्या तेजाचे पाणी वर येईल आणि आपण प्रभुच्या ज्योति आणि श्रुतिचा अनुभव करून आपल्या आत्म्याची तहान भागवु.

सावन कृपाल रुहानी मिशन, सावन आश्रम, संत कृपाल सिंह जी महाराज चौक, खेमानी रोड, उल्हासनगर- 2

अमृता : +91 84510 93275

No comments:

Post a Comment

शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष घाटकोपर (प.) तर्फे विविध गॅस एजन्सींना भेट देऊन चर्चासह दिले निवेदन !!

शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष घाटकोपर (प.) तर्फे  विविध गॅस एजन्सींना भेट देऊन चर्चासह दिले निवेदन !! युद्धजन्य परिस्थितीमुळे घरगुती गॅस सिलें...