आज "दादर" येथे वीर ग्रामस्थ मंडळ, मुंबई ( रजि.) तर्फे दिनदर्शिका प्रकाशन सोहळा-२०२२ चे आयोजन !!
मुंबई - ( दिपक कारकर ) :
चिपळूण तालुक्यातील "वीर" गावचं सन १९९० साली स्थापन झालेल्या "वीर ग्रामस्थ मंडळ,मुंबई" ( रजि. ) उपरोक्त मंडळा तर्फे गेल्या २ वर्षांपासून राबविण्यात येणारा उपक्रम "दिनदर्शिका प्रकाशन सोहळा" यावर्षी देखील होत आहे. वर्षभरात विविध समाजपयोगी उपक्रम राबवत सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या या मंडळाच्या सामाजिक उपक्रमासाठी योगदान म्हणून हा उपक्रम मंडळातील तरुण युवक मोठ्या परिश्रमाने करतात. ह्या वर्षीचा दिनदर्शिका प्रकाशन सोहळा - २०२२, आज शनिवार दि. ०४ डिसेंबर २०२१ रोजी १०२, पहिला मजला, तिरुपती ट्रेनिंग सेंटर, न्यू समाधान बिल्डिंग, सेनापती बापट मार्ग, दादर - ( पश्चिम ) येथे सायंकाळी ०७ ते १० या वेळेत आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याला निमंत्रित मान्यवरांची उपस्थिती लाभणार असून, मंडळाच्या कार्यकारिणी व सदस्यांनी जोरदारपणे पूर्वतयारी केली आहे. या सोहळ्याला पंचक्रोशीतील समाजबांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन वीर ग्रामस्थ मंडळाने केले आहे.

No comments:
Post a Comment