Saturday, 4 December 2021

उल्हासनगरातील धोकादायक इमारती व त्यांच्या मालकी हक्काबाबत परहित चँरिटेबल ट्रस्टने थोपटले दंड?

उल्हासनगरातील धोकादायक इमारती व त्यांच्या मालकी हक्काबाबत परहित चँरिटेबल ट्रस्टने थोपटले दंड?



कल्याण, (संजय कांबळे) : उल्हासनगर मधील शेकडो धोकादायक इमारती व त्यामध्ये राहत असलेल्या लाखो लोकांच्या मालकी हक्का बाबतीत आता त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी 'परहित चँरिटेबल ट्रस्ट' ने दंड थोपटले असून जोपर्यंत गोरगरिबांना न्याय मिळत नाही, धनदांडगे आणि प्रशासनाकडून यांचे मालकी हक्क प्रस्तापित होत नाही, तोपर्यंत संस्थेच्या माध्यमातून सनदशीर मार्गाने लढाई सुरू करणयाचे सुतोवाच अध्यक्ष विशाल गुफ्ता यांनी दिले आहेत.


सन १९४७च्या आसपास भारत पाकिस्तान फाळणीनंतर लाखो नागरिक भारतात आले, यातील सिंध प्रांतातून आलेल्यां एक लाख सिंधी नागरीकांचे पुनर्वसन केंद्रसरकारने उल्हासनगर मध्ये केले, शहरात लष्करासाठी बांधलेल्या ११ बँरेक मध्ये यांनी आपला संसार थाटला. या अगोदर १० हजार इतर धर्मिय आजुबाजूच्या परिसरात राहत होते. अवघ्या तेरा किलोमीटर वसलेल्या उल्हासनगरची लोकसंख्या झपाट्याने वाढली, त्यामुळे जागा कमी पडू लागल्याने १९८० नंतर जागा मिळेल तेथे इमारती बांधल्या, आजमितीस सुमारे ५० हजारांहून अधिक इमारती उल्हासनगरात आहेत, पण ७५ टक्के प्लांट धारकाकडे मालकी हक्क नाही तो जमीनमालक किंवा बिल्डर यांच्या कडे आहे, असे असतानाही शासनाने टँक्स व इतर माध्यमातून लाखोंचा महसूल गोळा केला, पण सोसायटीची नोंद देखील झाली नाही. याचाच परिणाम म्हणून उल्हासनगरात अनेक इमारती कोसळण्याच्या घटना घडल्या, कित्येक नागरिकांचा जीव गेला, मदतीच्या घोषणा झाल्या, आश्वासन दिले, परंतु अद्याप त्यांना मदत काय मिळाली नाही ?


मध्यतंरी उल्हासनगर पालिकेने १३ लोकांना डि फार्म वाटून त्यांचे मालकी हक्क मिळवून दिले. परंतु ज्यांंच्या जवळ पैसे नाहीत त्यांनी काय करावे? आजही शेकडो लोकांना हे फार्म मिळाले नाही, मिळालेतरी पैसे नसल्यामुळे ते काही करु शकत नाही, म्हणजे शेवटी मालकी बिल्डर किंवा जमीन मालकाची? त्यामुळे आयुष्यभर काबाडकष्ट करून घेतलेले घर किंवा प्लाँट खाली करून बेघर व्हायची वेळ त्यांच्या वर आली आहे. हे नको असेल तर इमारतीत राहून ती कोसळल्यानंतर जीव गमावणे असा पर्याय त्यांच्या पुढे राहिला आहे. त्यामुळे रिडव्हलपमेंट करते वेळी यांच्या वर अन्याय होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणूनच परहित चँरिटेबल ट्रस्ट पुढे आली असून उल्हासनगर मधील शेकडो बाधित लोकांच्या न्याय हक्कासाठी एक व्यापाक मोहीम सुरू केली आहे. यामध्ये अनेक सामाजिक संस्था, कार्यकर्ते, पत्रकार, वकील, आदीना सहभागी होण्याचे अवाहन संस्थेचे अध्यक्ष विशाल गुफ्ता यांनी केले असून, अन्याग्रसत प्लाँट धारक, चाळीत राहणारे, गोरगरीब यांनी या अंदोलनात सहभागी व्हावे अशी विनंती ही त्यांनी केली आहे.


हे अंदोलन अत्यंत सनदशीर मार्गाने, पुढे जाणार असून प्रंसगी उपोषण, जनहित याचिका, दाखल करून गोरगरीबांना त्यांचे मालकीहक्क प्राप्त होत नाही तोपर्यंत सुरू ठेवण्यात येणार असल्याचे परहितचे अध्यक्ष विशाल गुफ्ता यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष घाटकोपर (प.) तर्फे सर्वोदय येथून कोकणात जाणाऱ्या एस.टी. बसेस सुरू करण्याबाबत निवेदन !!

शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष घाटकोपर (प.) तर्फे सर्वोदय येथून कोकणात जाणाऱ्या एस.टी. बसेस सुरू करण्याबाबत निवेदन !! ** देवरूख, साखरपा, संगमेश...