Saturday, 4 December 2021

समीर विजय खाडिलकर यांना "कोकण कट्टा सन्मान पुरस्कार -२०२१ जाहीर !!

समीर विजय खाडिलकर यांना "कोकण कट्टा सन्मान पुरस्कार -२०२१ जाहीर !!


मुंबई, (शांत्ताराम गुडेकर) :
                  कोविड-१९ या महामारी काळात प्रत्येकजण आपआपल्या परीने जी काही मदत करता येईल ती करत होता. बोरीवली येथील सामाजिक कार्यकर्ता, महाराष्ट्र हरित सेना वन विभाग- महाराष्ट्र शासन सदस्य, माझी वसुधरा मित्र (पर्यावरण व वातावरनिय बदल विभाग- महाराष्ट्र शासन) माहिती अधिकार/ पोलीस मित्र /पत्रकार संरक्षण सेनाचे मुंबई जनसंपर्क अधिकारी समीर विजय खाडिलकरही याला अपवाद नाहीत. त्यांनी आवश्यक तेथे जी-जी गरज होती तेथे तेथे गरजेनुसार मदतीचा हात दिला. ठाणा जिल्ह्यातील दिवा परिसरातील दिवा गणेश नगर आणि बी.आर.आर नगर येथील गरजूंना अन्नधान्य किट देऊन मदतीचा हात देण्याची महत्वपुर्ण कामगिरी बजावली. आँगस्टमध्ये ईशान्य मुंबईतील ३० जेष्ठ नागरिकांसह जेष्ठ पत्रकार, मुक्त पत्रकार व श्रमिक पत्रकार यांना अन्नधान्य किटचे वाटप (वाटप करताना फोटो सुध्दा न घेता) केले. यापुर्वीच त्याच्या सेवाभावी कार्याची दखल घेत खार पूर्व येथील "श्री स्वामी समर्थ " कृपासिंधू सामाजिक संस्था (नोंदणीकृत) अध्यक्ष सुनिल मांजरेकर, सल्लागार रविंद्र आंब्रे यांनी समीर खाडिलकर यांचा "कोविड योध्दा" सन्मानपत्र देऊन गौरव केलेला आहे. तसेच भा.म.सेना राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश सकुंडे (संपादक- शिववृत्त), महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अँड. आनंदजी गुगळे यांनी "कोविड योध्दा" या सन्मानपत्राने गौरविले. तसेच साप्ता. धगधगती मुंबईचे संपादक भीमराव धुळप, पाक्षिक आदर्श वार्ताहर संपादक पंकजकुमार पाटील यांच्यासह विविध संस्था, संघटनाव वर्तमानपत्र यांनीही समीर विजय खाडिलकर यांचा "कोविड योध्दा" सन्मानपत्रने गौरव केला आहे. समीर विजय  खाडिलकर यांना सेवार्थ उपक्रमांची चळवळ असे ब्रीद वाक्य घेऊन  मुंबईसह कोकण आणि अनेक जिल्ह्यात सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, पर्यावरण, कला, क्रीडा, सांस्कृतीक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या कोकण कट्टा या संस्थेतर्फे समीर विजय  खाडिलकर यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना "कोकण कट्टा सन्मान-२०२१" या पुरस्काराने वीर सावरकर सेवा केंद्र, सनसिटी चित्रपट गृह समोर, विलेपार्ले पूर्व, मुंबई -५७ येथे संस्थापक अजित पितळे, अध्यक्ष नितीन कुलकर्णी, सचिव योगेश साटम, कोषाध्यक्ष सुजित कदम यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर यांच्या उपस्थितीत कोकण कट्टा च्या २२ व्या वर्धापन दिन निमित्ताने शनिवार दिनांक ११ डिसेंबर २०२१ रोजी संध्याकाळी ५ ते ८ या वेळेत गौरविण्यात येणार आहे. खाडिलकर यांना हा मानाचा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांना अनेकांकडून अभिनंदनासह शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

No comments:

Post a Comment

मोहने येथील ‘संघानी क्लिनिकचे; सांडपाणी रस्त्यावर !!

मोहने येथील ‘संघानी क्लिनिकचे; सांडपाणी रस्त्यावर !! ** बायोमेडिकल कचऱ्यामुळे नागरिक हैराण मोहने, संदीप शेंडगे : स्वर्गीय काशिना...