Saturday, 4 December 2021

कल्याण एस टी आगारातील तीस कर्मचारी कामावर, दररोज दहा लाखांचे नुकसान, प्रवाशांमध्ये संताप?

कल्याण एस टी आगारातील तीस कर्मचारी कामावर, दररोज दहा लाखांचे नुकसान, प्रवाशांमध्ये संताप?


कल्याण, (संजय कांबळे) : गेल्या कित्येक दिवसांपासून सुरू असलेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या अर्थात एसटी कर्मचा-याच्या विविध मागण्यांसाठी सुरू असलेला संप महिना होत आला तरीही अद्याप सुरू असल्याने याचा त्रास मात्र प्रवाशांना होत असून त्यांच्या मध्ये कर्मचारी व प्रशासन यांच्या विरोधात कमालीचा संताप निर्माण होत असून कल्याण एसटी आगारातील ३० कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत. तरीही दररोज सुमारे १० लाखांचे नुकसान आगारास होत असल्याचे आगारप्रमुख विजय गायकवाड यांनी सांगितले.


ऐन दिवाळीच्या काळात एसटी कर्मचा-यांनी संपाचे हत्यार उपसले, यामुळे राज्यातील २५० च्या आसपास बसडेपो ठप्प झाले, चारपाच दिवसात संप मिटले असे वाटत असतानाच भाजपाचे आमदार सदाभाऊ खोत व गोपीचंद पडळकर हे या अंदोलनावर स्वार झाले, भाजपाच्या अनेक वरीष्ठ नेत्यांनी या आंदोलनास सक्रिय पाठिंबा दिला. त्यामुळे हे अंदोलन हायजॅक झाले की काय अशी शंका निर्माण झाली. दिवसेंदिवस अंदोलन चिघळत गेले, या दरम्यान ५० भर कर्मचा-यांचा बळी गेला, आमदार सदाभाऊ खोत व आ. पडळकर हे कर्मचारी यांना भडकावत आहेत, अशी टीका परिवहनमंत्री अनिल परब  यांनी केली होती. 


या काळात शासन व कर्मचारी यांच्यात चर्चा सुरू होत्या, शासनाने दोन पाऊले मागे यावे व कर्मचारी यांनी दोन पावले मागे यावे असे ठरवून वेतनश्रेणी वाढ करण्यात आली, मात्र कर्मचारी विलिनीकरणावर आढून राहिले, त्यामुळे या दोन आमदारांनी आंदोलनातून काढता पाय घेतला. या दरम्यान अनेक कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले. सुमारे ४५० कोटी रुपये नुकसान झाले, ४०/५० गाड्यावर हल्ले झाले, त्यामुळे प्रशासन इरीला पेटले.या दोघामध्ये 'बिचाऱ्या' प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागले, अनेक प्रवाशांनी, कर्मचारी व शासन यांच्या विरोधात संताप व्यक्त केला.म.


मुख्यमंत्री, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, विरोध पक्ष यांनी ही अंदोलन मागे घ्यावे, संप तूटूपर्यत ताणू नये असे अवाहन केले. यानंतर काही कर्मचारी कामावर हजरही झाले.

कल्याण एसटी आगारातील १५ चालक वाहक,तर वर्कशॉप विभागातील १५ कर्मचारी असे ३० कर्मचारी कामावर हजर झाले, तर ४९ कामगारांना निलंबित करण्यात आले आहे. एकूण ३५० कामगार असून दररोज २५ हजार किलोमीटर गाडी चालत होती. यातून दिवसाला सुमारे १० लाखाच्या आसपास उत्पन्न आगारास मिळत होते ते थांबले आहे. केवळ कल्याण भिवंडी यामार्गावर ८/१० बस फे-या होत असल्याचे आगारप्रमुख विजय गायकवाड यांनी सांगितले. लांबपल्याच्या नगर, नाशिक, कोल्हापूर, कोकणात जाणाऱ्या गाड्या संपामुळे ठप्प झाल्यामुळें प्रवाशांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासन व कर्मचारी यांनी संप इतका ताणायला नको होता, एकीकडे' प्रवाशांच्या सेवेसाठी'अशी टेंभा मिरवायचा व दुसरीकडे त्याच प्रवाशांना त्रास द्यायचा ?हे योग्य आहे का, ज्या प्रवाशांच्या जिवावर रोजीरोटी कमावता त्याच प्रवाशांनी एसटी कडे पाट फिरवली तर तूमचे काय होईल?अशी संतप्त प्रतिक्रिया एका जेष्ठ नागरिकांने व्यक्त केली. त्यामुळे एसटी कर्मचारी व प्रशासन या दोघांनी या बोलक्या प्राथिनिधीक प्रतिक्रियेचा विचार करावा, अन्यथा "बैल गेला नी झोपा केला"अशी वेळ येवू नये हिच अपेक्षा!

No comments:

Post a Comment

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !!

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !! *कल्याण, दि. 13...