Thursday, 30 December 2021

फ, ह आणि आय प्रभागातील अनधिकृत इमारतीच्या बांधकामावर निष्कासनाची कारवाई !

फ, ह आणि आय प्रभागातील अनधिकृत इमारतीच्या बांधकामावर निष्कासनाची कारवाई ! 


कल्याण : महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या निर्देशानुसार व विभागीय उपायुक्त पल्लवी भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली 6/फ प्रभागाचे सहा. आयुक्त किशोर शेळके यांनी डोंबिवली पूर्व, गोपाळ नगर गल्ली क्र.3, येथील बांधकामधारक जयदीप भागीनाथ त्रिभुवन यांच्या नावे असलेल्या तळ +3 मजल्याचे आर.सी.सी अनधिकृत इमारतीच्या बांधकामावर निष्कासनाची धडक कारवाई आज सुरु केली. सदर निष्कासनाची कारवाई टिळक नगर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी/कर्मचारी, ग प्रभागाच्या सहा. आयुक्त रत्नप्रभा कांबळे व शैलेश मळेकर उप अभियंता बांधकाम, प्रभाग अधिक्षक दिनेश वाघचौरे , महापालिकेचे पोलिस कर्मचारी, अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे कर्मचारी यांच्या मदतीने व 3 ब्रेकर, 1 गॅस कटर यांच्या सहाय्याने करण्यात येत आहे.


त्याचप्रमाणे विभागीय उपआयुक्त सुधाकर जगताप यांचे मार्गदर्शनाखाली 7/ह प्रभागाचे सहा. आयुक्त अक्षय गुडधे यांनी डोंबिवली पश्चिम, गणेश नगर येथील, खाडीकिनारी विकासक सचिन भोईर यांच्या तळ+4 मजली आर.सी.सी. इमारतीच्या चालू असलेल्या बांधकामावर निष्कासनाची धडक कारवाई करण्यास आज प्रारंभ केला. सदर निष्कासनाची कारवाई अतिक्रमण नियंत्रण विभागाचे कर्मचारी, विष्णुनगर पोलिस स्टेशन पोलिस कर्मचारी,महापालिकेचे पोलिस कर्मचारी यांच्या मदतीने व 1 पोकलन, 3 ब्रेकर यांच्या सहाय्याने करण्यात येत आहे.


9/आय प्रभागातही सहा. आयुक्त संजय साबळे यांनी विभागीय उपआयुक्त बाळासाहेब चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली, आडीवली ढोकळी, येथील विकासक जयेश पटेल यांच्या तळ+4 आर.सी.सी अनधिकृत इमारत निष्कासनाची धडक कारवाई आज सुरू केली. सदर इमारतीत ऐ,बी,सी,डी असे एकूण चार विंग असून ऐ,बी व सी तळ+4 मजली आहे. डी विंग मध्ये तळ+2 मजली आहे, आज रोजी सदर इमारतीतील डी विंगचे बांधकाम पूर्णपणे जमीदोस्त करण्यात आले आहे. सदर निष्कासनाची कारवाई 4/जे प्रभागाच्या सहा. आयुक्त हेमा मुंबरकर, 5/ड प्रभागाच्या सहा. आयुक्त सविता हिले, अधिक्षक गोवेकर, मानपाडा पोलिस स्टेशनचे पोलिस कर्मचारी, महापालिकेचे पोलिस कर्मचारी, अतिक्रमण नियंत्रण विभागाचे कर्मचारी यांच्या मदतीने व 1 पोकलन, 1 जेसीबी यांच्या सहाय्याने करण्यात येत आहे.


No comments:

Post a Comment

वालधुनी नदी पुनर्जीवित करण्याबाबत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे उपायुक्त रामदास कोकरे यांच्या सोबत महत्वपूर्ण बैठक !!

वालधुनी नदी पुनर्जीवित करण्याबाबत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे उपायुक्त रामदास कोकरे यांच्या सोबत महत्वपूर्ण बैठक !! कल्याण, प...