Friday, 7 January 2022

डोंबिवलीतील 531 बेडचे विभा कोविड रुग्णालय सज्ज !! "तिसऱ्या लाटेच्या आधीच सुविधा तयार ; खासदार, आमदार आणि आयुक्तांनी केली पाहणी"

डोंबिवलीतील 531 बेडचे विभा कोविड रुग्णालय सज्ज !!
"तिसऱ्या लाटेच्या आधीच सुविधा तयार ; खासदार, आमदार आणि आयुक्तांनी केली पाहणी"


कल्याण, ऋषिकेश चौधरी - कल्याण डोंबिवली महापलिका हद्दीत कोरोना रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढत आहे.




त्यामुळे तिस:या लाटेची शक्यता व्यक्त केली जात आहे. तिस:या लाटेशी सामना करण्यासाठी महापालिकेने तयारी सुरु केली आहे. डोंबिवलीतील विभा कंपनीज्या जागेत 531 बेडचे कोविड रुग्णालय रुग्णांच्या सेवेसाठी सज्ज करण्यात आले असून त्यात 50 बेड हे मुलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. 


खासदार यांच्यासह भाजप आमदार रविंद्र चव्हाण, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्यासह  शिवसेना पदाधिकारी  दीपेश म्हात्रे, राजेश कदम, आयएमएचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील यांनी आज दुपारी रुग्णालयाची पाहणी केली.

No comments:

Post a Comment

नागरी संरक्षण नवी मुंबई समूह ठाणे तर्फे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा; परेड सराव, ध्वजवंदन व स्वयंसेवक क्षमता वृद्धी प्रशिक्षण यशस्वी !!

नागरी संरक्षण नवी मुंबई समूह ठाणे तर्फे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा; परेड सराव, ध्वजवंदन व स्वयंसेवक क्षमता वृद्धी प्रशिक्षण यशस्वी !! ...