उल्हासनगरात बिबट्याचे दर्शन !!
उल्हासनगर, बातमीदार : गेल्या काही दिवसांपासून अंबरनाथ आणि कल्याण तालुक्यात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याने आपली पावले आता उल्हासनगर शहराकडे वळवली आहेत. उल्हासनगर आणि अंबरनाथ शहराच्या वेशीवर असलेल्या सोंग्याची वाडी परिसरात नुकतेच बिबट्याचे दर्शन झाले.धक्कादायक म्हणजे या परिसरात पोहोचण्यासाठी बिबट्याने आयुध निर्माण वसाहतीतील नागरी वस्ती आणि २४ तास सुरू असणारा कल्याण बदलापूर राज्यमार्ग ओलांडला असण्याची शक्यता आहे. परतीच्या मार्गावरही त्याने अनेक नागरी अडथळे पार केल्याची शक्यता आहे. या बातमीने उल्हासनगर शहरात एकच खळबळ उडाली आहे.
वन विभागाकडे याची माहिती पोहोचताच त्यांनी तातडीने या परिसरात धाव घेऊन येथील जनतेला सावध राहण्याचे तसेच काळजी घेण्याचे आवाहन केले

No comments:
Post a Comment