Thursday, 13 January 2022

मुंबई लोहमार्ग पोलिसांनकडून सोने व्यापाऱ्यांला लुटले, तक्रार होताच सारवासारव, मात्र अप्पर पोलीस महासंचालकाकडून गंभीर दखल !!

मुंबई लोहमार्ग पोलिसांनकडून सोने व्यापाऱ्यांला लुटले, तक्रार होताच सारवासारव, मात्र अप्पर पोलीस महासंचालकाकडून गंभीर दखल !!


ठाणे, बातमीदार : १६ डिसेंबर २०२१ रोजी गिताजंली एक्सप्रेस ने प्रवास करणाऱ्या एका सोने व्यापाऱ्यांला घातपात विरोधी तपासणी अर्थात चेकिंगच्या नावाखाली तसेच सीसीटीव्ही तून वाचण्यासाठी ब्रिजवर नेऊन त्यांच्या कडून तब्बल काही ग्रँम सोने काढून घेऊन त्यांला लुटणा-या रेल्वे पोलिसांच्या विरोधात रेल्वे हेल्पलाईन ला तक्रार करताच यांनी सरवासारव केली खरी, परंतु ही बाब ऐडीजी श्रीमती प्रज्ञा सरवदे मँडम यांच्या निदर्शनास येताच त्यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेऊन आरोपीना तात्काळ निंलबित करून त्याची चौकशी सुरू केली आहे.  त्यामुळे या चांडाळ चौकडीचे व यांना वाचविणा-या वरीष्ठ अधिका-याचे धाबे दणाणले आहेत.


याबाबत सविस्तर वृत्त असे की, काही असामाजिक घटकांकडून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे काही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून मुंबई लोहमार्ग अप्पर पोलीस महासंचालक डॉ. प्रज्ञा सरवदे मँडम यांनी येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशावर, लक्ष ठेवणे व संशयास्पद व्यक्तीची तपासणी करण्याचे आदेश जीआरपी अर्थात रेल्वे पोलिसांना दिले आहेत, त्यानुसार सी एस एमटी स्टेशन वर काही रेल्वे पोलीसांची नियुक्ती करण्यात आली होती. दि १६ डिसेंबर २०२१ रोजी एक सोन्याचा व्यापारी गिताजंली एक्स्प्रेस ने जाण्यासाठी प्लॅटफार्म नं. १८ वरुन जात असताना ड्युटीवरील ४ हेडकाँस्टेंबल ने त्याला प्लॅटफार्मवर सीसीटीव्ही कॅमेरे असल्याने ब्रिज वर नेले, त्याची बँग चेक केली असता तो सोन्याचा व्यापारी असल्याचे समजले, मग काय या पोलिसांनी त्याला दम देऊन, तुझ्या वर गुन्हा दाखल करतो, तूला आत टाकतो, असे बोलून धमकावले व त्याच्या कडून एकूण सोन्याच्या पैकी काही ग्रँम सोने काढून घेतले, त्याची किंमत सुमारे दोन ते तीन लाख असेल व त्याला गिंताजलीने रवाना केले, या व्यापाऱ्यांने काही अंतर प्रवास केल्यानंतर त्याच्या लक्षात आले की, आपली फसवणूक झाली आहे.

त्यांने ताबडतोब १३९ या रेल्वे हेल्पलाइन नंबर वर तक्रार केली. हा काँल दिल्ली येथे जाऊन तो प्रकार घडलेल्या सीएस एमटी वाडी बंदर येथे ट्रान्सपर केला, हे होताच या पोलिसांची धावपळ उडाली, परंतु सर्व 'मिलबाटके खाऊ' असे चालत असल्याने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वरील पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक यांनी केवळ या चौघांचे जबाब घेतले व ८/१० दिवसांसाठी या स्टेशन वरुन इतरत्र ड्यूटी दिली, परंतु सीएस एमटी येथे दररोज लाखोंची कमाई होत असल्याने त्यांना पुन्हा येथेच ड्यूटी देण्यात आली. अशी चर्चा ऐकायला मिळाली.

परंतु ही बाब काही पत्रकारांच्या लक्षात आली त्यांनी याविषयी अधिक माहिती मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले, यावेळी त्यांना अंत्यत धक्कादायक माहिती मिळाली, ती म्हणजे, हे रँकेट काही साधेसुधे नसून याचा कर्ता करविता हा एक हेडकाँस्टेंबल असून त्याची सेंटिंग अगदी खालपासून ते अतिवरीष्ठ अधिका-यापर्यत असून काही अनलिगली (अनधिकृतपणे) व्यापाऱ्यांना याने स्वतःचे कोड वर्ड दिले आहे, त्यापैकी एकावर छत्रपती शिवाजी महाराज व दुसऱ्या वर इंजिन असे फोटो आहेत, हे दाखवल्यानंतर कोणत्याही रेल्वे स्टेशन अथवा प्लॅटफार्मवरून या लोकांनी काही गैरकानूनी साहित्य नेले तर कोणाची अडविण्याची हिंमत होत नाही, या बदल्यात या महाशयांना  महिन्याला लाखोचा 'मलिदा' मिळतो, यातूनही काही अंगाशी आलेच तर ते सेटल करण्याची आर्थिक ताकद याच्या कडे आहे. त्यामुळे येथे ड्यूटी घेण्यासाठी हे पोलीस लाखो रुपये वरीष्ठांना देतात, असे समजते.

या घटनेची माहिती लोहमार्ग विभागाच्या अतिरिक्त पोलीस महासंचालक श्रीमती डॉ. प्रज्ञा सरवदे मँडम यांंच्यापर्यत पोहचली. त्यानंतर सत्यता तपासून या ४ पोलीस कर्मचाऱ्यांना निंलबित केले आहे. दत्ता जाधव, मनोज कोष्टी, सुभाष सरगर आणि शरद बोराडे अशी या चांडाळ चौकडीची नावे असल्याचे समजते. तर त्याना वाचविणा-या वरीष्ठांचे धाबे दणाणले आहेत.

प्रतिक्रिया

या प्रकरणी मी स्वतः लक्ष घालून खरे काय? खोटे याची चौकशी करून दोषी आढळल्यास कडक कारवाई करण्यात येईल, श्रीमती डॉ प्रज्ञा सरवदे मँडम. (लोहमार्ग अप्पर पोलीस महासंचालक, चर्चगेट, मुंबई)

No comments:

Post a Comment

पर्यावरण व मानव–वन्यजीव संघर्ष या विषयांवर जनजागृती !!

पर्यावरण व मानव–वन्यजीव संघर्ष या विषयांवर जनजागृती !! उरण दि ३१, (विठ्ठल ममताबादे) : पोसरी ठाकूरवाडी येथील रायगड जिल्हा प्राथमि...