Thursday, 13 January 2022

भिवंडी -कोपर येथे समाज गृह इमारतीचे उदघाटन !!

भिवंडी -कोपर येथे समाज गृह इमारतीचे उदघाटन !!


भिवंडी, दिं,13, अरुण पाटील (कोपर) : जिल्हा ग्रामविकास निधी अंतर्गत बांधण्यात आलेल्या समाज गृह इमारतीचे उदघाटन आज (दिं,13) रोजी  जिल्हा परिषद सदस्यां तथा माजी महिला बालकल्याण सभापती -ठाणे सौ. सपना राजेंद्र भोईर यांच्या हस्ते पार पडला. 

यावेळी सन्मानीय सदस्य म्हणून भिवंडी पंचायत समितीचे  सभापती महेंद्र नाथा पाटील, बिजिपीचे धडाडीचा कार्यकर्ता श्री. राजेंद्र भोईर, एकता महिला मंडळ -कोपर--अध्यक्षा -सौ. सरिता गोवर म्हात्रे, पत्रकार श्री. अरुण पुंडलिक पाटील, मनसेचे धडाडीचे नेतृत्व श्री. संजय पांडुरंग पाटील, श्री. चेतन पाटील,श्री विनायक सुरेश म्हात्रे, संतोष म्हात्रे, श्री.लक्ष्मण पाटील, कबीर घरत, नरेश पाटील, हे उपस्थित होते. 

तसेच ग्रामपंचायत कमिटी -कोपर चे जनतेमधून निवडून आलेले  सरपंच श्री. रमेश सीताराम पाटील, उपसरपंच श्री. भारत गुरुनाथ पाटील,सदस्य कबीर नामदेव पाटील, सदस्यां सौ. प्रभावती लक्ष्मण पाटील, श्रीमती. संगीता दिपचंद घरत, सौ.हेमा विनायक म्हात्रे, सदस्य श्री रुपेश गुरुनाथ घरत, श्री. रुपेश उमाकांत पाटील, सौ. प्रेरणा हरेश पाटील, सौ. शीतल चेतन पाटील, व ग्रामसेवक श्री. गणेश सुकऱ्या जाधव, वरिष्ठ लिपिक श्री. विनेश देवराम पाटील तसेच ग्रामपंचायत कर्मचारी मंडळ व ग्रामस्थ उपस्थित होते. 

ग्रामसेवक श्री. गणेश जाधव यांनी या समाज गृह इमारतीसाठी विशेष मेहनत घेतली असून यांनी यापूर्वी देखील कोपर ग्रामपंचायतीच्या विकासात मोलाचावाटा उचलला आहे.

No comments:

Post a Comment

पर्यावरण व मानव–वन्यजीव संघर्ष या विषयांवर जनजागृती !!

पर्यावरण व मानव–वन्यजीव संघर्ष या विषयांवर जनजागृती !! उरण दि ३१, (विठ्ठल ममताबादे) : पोसरी ठाकूरवाडी येथील रायगड जिल्हा प्राथमि...