Thursday, 13 January 2022

श्री मार्लेश्वर देवस्थानचा वार्षिक यात्रोत्सव रद्द !!

श्री मार्लेश्वर देवस्थानचा वार्षिक यात्रोत्सव रद्द !!


रत्नागिरी, बातमीदार : कोरोनोच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या आदेशानुसार यावर्षी ही मार्लेश्वर यात्रा रद्द करण्यात आली आहे. मार्लेश्वर देवस्थान मानकरी व पुजारी यांचे उपस्थितीत फक्त ५० जणांच्या उपस्थितीत विधी सोहळा होणार आहे.
कोरोनोच्या पार्श्वभूमीवर राज्याभरात नव्याने निर्बंध घालण्यात आले आहेत. या निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर मार्लेश्वर देवस्थानच्या मानकऱ्यांची देवरूख पोलीस ठाण्यात एक बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीमध्ये मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा पार पाडण्याचे ठरविण्यात आले आहे. 

मार्लेश्वर व गिरीजा देवी विवाह हा १४ जानेवारी २०२२ रोजी म्हणजेच मकरसंक्रांतीच्या दिवशी दुपारी १.२५ मिनिटांनी संपन्न होणार आहे. या विवाहसोहळ्यासाठी गिरीजाईमातेची पालखी साखरप्यातून १३ जानेवारीला संध्याकाळी मार्लेश्वराला निघणार आहे. पालखीसोबत फक्त २० जणांना परवानगी देण्यात आली आहे. 

गिरीजाईमातेची पालखी ही १३ तारखेलाच रात्री मार्लेश्वरला पोहोचेल. मानाच्या दिंड्यांसाठी काही पास देण्यात आले असून दिंडीसोबत मार्लेश्वरात आलेल्या ज्या भक्तांकडे पास असतील अशी तीच भक्त मंडळीच लग्न सोहळ्यासाठी उपस्थित राहू शकतील. मार्लेश्वर पायथ्यापाशी पासाव्यतिरिक्त कोणत्याही वाहनास प्रवेश देण्यात येणार नाही. मारळ फाटा व देवस्थान परिसर येथे पोलिसांकडून नाकाबंदी करण्यात येणार असून, पास असलेल्या गाड्या व व्यक्ती यांनाच प्रवेश दिला जाईल.

No comments:

Post a Comment

सोहन कौर सतविंदर सिंग मानकू एज्युकेशन सोसायटी (रजि.) संचालित गुरु गोविंद सिंग इंग्लिश स्कूल चे  वार्षिक स्नेहसंमेलन, विद्यार्थी गुणगौरव समार...