Monday, 10 January 2022

ताडी पिल्याने झाला दोन तरुणांचा मृत्यू ! डोंबिवलीतील घटना, ताडीचे दुकान होते अनधिकृत !!

ताडी पिल्याने झाला दोन तरुणांचा मृत्यू ! डोंबिवलीतील घटना, ताडीचे दुकान होते अनधिकृत !!


डोंबिवली, हेमंत रोकडे : डोंबिवली पश्चिम येथील कोपर परिसरातील गावदेवी मंदिराजवळ असलेल्या अनधिकृत ताडीच्या दुकानात ट्रॅफिक वॉर्डन असणारा तसेच कोपर येथील रहिवासी असणारा २८ वर्षीय स्वप्नील चोळके आणि कैलास नगर येथील रहिवासी असणारा २२ वर्षांचा सचिन पाडमुख अशा दोन मित्रांनी एकत्र एकत्र ताडी प्यायचा बेत केला. 


मात्र रात्री ९.३० च्या सुमारास ताडी पिऊन घरी निघालेले स्वप्नील व सचिन दोघंही रस्त्यातच कोसळले. त्यांनतर या दोघांनाही शास्त्री नगरला नेले असता सचिनचे निधन झाल्याचे सांगितले. तर स्वप्नील याला खाजगी रुग्णालयात दाखल केले असताना त्याचेही निधन झाल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.

No comments:

Post a Comment

भिवंडी आगरी महोत्सवात संपादक डॉ. किशोर पाटील यांचा गौरव !!

भिवंडी आगरी महोत्सवात संपादक डॉ. किशोर पाटील यांचा गौरव !! ठाणे (एस. एल. गुडेकर) : सर्व समाजघटकांना सोबत घेऊन जाणारा आणि सामाजिक...