Thursday, 13 January 2022

अंधेरीत लहानग्यांना पतंग वाटप !!

अंधेरीत लहानग्यांना पतंग वाटप !!


मुंबई, (शांताराम गुडेकर /संतोष गावडे) : मरोळ, अंधेरी पूर्वेला मरोळ येथील 'भैरवनाथ जनसेवा संस्थेच्या वतीने मकरसंक्रांतीच्या निमित्ताने विभागातील सर्व लहानग्यांना पतंगांचे वाटप करण्यात आले. संपूर्ण वर्षभरात विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करणाऱ्या भैरवनाथ जनसेवा संस्थेचे आणि पदाधिकाऱ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

पतंग वाटपाच्या या छोटेखानी कार्यक्रमात शिवसेनेचे स्थानिक शाखाप्रमुख बिपीन शिंदे, तर स्थानिक रहिवाशी विजय राय, नितीन मते, अमोल हांडे, बाबू आले, विनीत सिंह, मोहन कांगणे, गुलाब यादव, राजू तिवारी, दीपक घाग, तसेच विभागातील सर्व लहानथोर नागरिक उपस्थित होते. 

संस्थेच्या माध्यमातून अशीच जनसेवा करण्यासाठी ईश्वराने सदैव पाठबळ देत राहावे हीच आपली कामना असल्याचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. राजु गणपत सुर्यवंशी यांनी यावेळी सांगितले.

No comments:

Post a Comment

सोहन कौर सतविंदर सिंग मानकू एज्युकेशन सोसायटी (रजि.) संचालित गुरु गोविंद सिंग इंग्लिश स्कूल चे  वार्षिक स्नेहसंमेलन, विद्यार्थी गुणगौरव समार...