Thursday, 13 January 2022

गुहागर तालुका नमन संघटनातर्फे विलेपार्ले येथील मास्टर दीनानाथ नाट्यगृह येथे नमन प्रयोगाला उत्स्फूर्त प्रतिसाद !! कोकणातील या दुर्लक्षित नमनला शासन दरबारात न्याय, हक्क मिळवून देण्यासाठी मी आवश्यक ते सहकार्य करणार -डॉ. प्रकाश खांडगे (लोककला अभ्यासक)

गुहागर तालुका नमन संघटनातर्फे विलेपार्ले येथील मास्टर दीनानाथ नाट्यगृह येथे नमन प्रयोगाला उत्स्फूर्त प्रतिसाद !!

कोकणातील या दुर्लक्षित नमनला शासन दरबारात न्याय, हक्क मिळवून देण्यासाठी मी आवश्यक ते सहकार्य करणार -डॉ. प्रकाश खांडगे (लोककला अभ्यासक)


मुंबई, (शांताराम गुडेकर) :
                परशुरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कोकणभूमीत अनेक कलांचा विकास झाला आहे. त्यामध्ये नमन (खेळे), शक्तीतुरा (जाकडीनृत्य), भारुड, डफावरील पोवाडे इ. कलांचा समावेश आहे. कोकणातील विशेषतः रत्नागिरी जिल्हातील नमन (खेळे) या लोककलेची प्रसिध्दी जगभर पसरली आहे. श्री गणरायाचे आगमन, मृदंग, ढोलकीच्या तालावर ठेका धरणारी नटखट गवळण, काल्पनिक पौराणिक वगनाट्य सादर करणारी ही नमन लोककला कोणतेही आर्थिक पाठबळ नसताना, शासनाचे अनुदान नसतानाही कोकणवाशीय जोपासत आहेत. 


या लोककलेला फार प्राचीन काळापासून रत्नागिरी,चिपळूण, गुहागर, संगमेश्वर, देवरुख, लांजा, राजापूर, मंडणगड या तालुक्यातील लोकांनी ही लोककला जोपासून शासनाच्या, भारत सरकारच्या अनेक योजना या लोककलेतून लोकांपर्यंत पोहचवून त्याविषयी जनजागृती करण्याचे काम पार पाडले आहे. 


झाडे लावा-झाडे जगवा, पाणी वाचवा, नशाबंदी, वृक्षतोड थांबवा, स्त्री भ्रुणहत्या, शिक्षणाचे महत्त्व इ.विषयांवर या लोककलेतून लोकांपर्यंत संदेश देण्याची महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे.गुहागर तालुका नमन  संघटना आयोजित बहुरंगी नमन ,बहुरंगी नमन  विलेपार्ले येथील मास्टर दीनानाथ नाट्यगृह येथे गुहागर तालुका नमन संघटना या तालुका शाखेच्या उन्नती करता आणि तालुक्यातील नमन मंडळांना आणि लोक कलावताना  आपली कला सादर करण्याची संधी मिळावी,तसेच तालुक्यातील कलावंतांना त्याच्या कला गुणांना वाव मिळावा तसेच नमन संघटनेच्या गुहागर तालुका शाखेचा प्रसार आणि प्रचार व्हावा,आणि प्रत्येक गावा- गावात नमन मंडळांना आणि नमन लोक कलावंतांना जागृत करून शासन दरबारी न्याय मिळावा या शुद्ध हेतूने आर्थिक निधी संकलन करण्यासाठी कुणबी वाडी विकास मंडळ असोरे (ता. गुहागर) याचे नमन सादरीकरण झाले. 


या नमनला कोकणवासियांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.सुधाकर मास्कर याच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न झाला.सूत्रसंचालन  सुधीर तानकर यांनी केले. अनेक उदाहरणं देत नमन कला काय आहे हे तानकर यांनी सरळ न सोप्या शब्दात पटवून देत नमन रसिकांची मने जिंकली.प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. प्रकाश खांडगे-लोककला अभ्यासक, साहित्यिक, लेखक,अमृताताई  बोंद्रे-लोककला अभ्यासक नमनप्रेमी,रविंद्र मटकर-नमन लोककला संस्था-अध्यक्ष /अखिल महाराष्ट्र कुणबी सेव संघ माजी अध्यक्ष,रवी बावकर- अखिल महाराष्ट्र कुणबी सेवा- अध्यक्ष,संतोष चौघुले- कुणबी बॅंक संचालक,शरद भावे-मनसे मा. शाखा अध्यक्ष, शांताराम गुडेकर-पत्रकार, सतीश जोशी- लोककलावंत/ निर्माते तसेच नमन लोककला संस्था- खजिनदार, अनुप पुरोहित- इल .आय. सी (एम.डी.आर.टी.) इंजेट- उद्योजक, प्रमोद गांधी- एम डी, अनुश्री वेलूंडे -असोरे, मनोज डाफळे- गुहागर भाजपा  कार्यकर्ते, प्रमोद तरळ- पत्रकार,सुरेश वीर, दिपक बादावटे-अध्यक्ष कुणबीवाडी विकास मंडळ असोरे गुहागर, जगन्नाथ शिंदे*- गुहागर तालुका नमन मंडळ -उपाध्यक्ष आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ. प्रकाश खांडगे -लोककला अभ्यासक, साहित्यिक, लेखक यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की कोकणातील या दुर्लक्षित नमनला शासन दरबारात न्याय, हक्क मिळवून देण्यासाठी मी आवश्यक ते सहकार्य करून अन्य कला यांना मिळणारे फायदे या नमन कलेलाही मिळवून देण्याचे आश्वासन दिले. तर अमृताताई बोंद्रे-लोककला अभ्यासक यांनी जुन्या आठवणी सांगत ही कला वाचवण्यासाठी आपण प्रामाणिक प्रयत्न करू तसेच  मानधन व अन्य फायदे कसे मिळवता येतील यासाठी आवाज उठवत या कलेला जोपसण्याचे काम करू. रवींद्र मटकर यांनी बोलताना सांगितले की कोकणातील लोकप्रतिनिधी यांनी आजवर या लोक कलेसाठी काय प्रयत्न केले माहित नाही पण यापुढे त्यांनी या कोकणातील नमन कलाकारसाठी आवाज उठवावा. या कलेला न्याय द्यावा. आता आम्ही गप्प बसणार नाही. आम्हाला आवश्यक तो न्याय देत अन्य कलेला मिळणारे सर्व फायदे मिळायला हवेत. तसे झाले नाही तर आम्ही हक्कासाठी रस्त्यावर उतरून आमचा हक्क मिळेपर्यंत लढा देऊ. सर्व मान्यवर पाहुणे यांना आभारपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कोरोनाचे सर्व नियम पाळून हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

No comments:

Post a Comment

सोहन कौर सतविंदर सिंग मानकू एज्युकेशन सोसायटी (रजि.) संचालित गुरु गोविंद सिंग इंग्लिश स्कूल चे वार्षिक स्नेहसंमेलन, विद्यार्थी गुणगौरव समारंभ संपन्न !

सोहन कौर सतविंदर सिंग मानकू एज्युकेशन सोसायटी (रजि.) संचालित गुरु गोविंद सिंग इंग्लिश स्कूल चे  वार्षिक स्नेहसंमेलन, विद्यार्थी गुणगौरव समार...