Tuesday, 18 January 2022

ज्येष्ठाच्या रांगोळी,चित्रकला, हस्तकला स्पर्धेचा निकाल जाहीर !! "चित्रकला- रांगोळी स्पर्घेत बाळ पंडित प्रथम तर हस्तकला स्पर्धेत अश्विनी बोरगावकर प्रथम"

ज्येष्ठाच्या रांगोळी,चित्रकला, हस्तकला स्पर्धेचा निकाल जाहीर !!

"चित्रकला- रांगोळी स्पर्घेत बाळ पंडित प्रथम तर हस्तकला स्पर्धेत अश्विनी बोरगावकर प्रथम"


मुंबई, (शांताराम गुडेकर) :

            गोरेगाव पूर्व येथील, संकल्प ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने मकर संक्रात सणाचे औचित साधून , ज्येष्ठाच्या रांगोळी, चित्रकला व हस्तकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. चित्रकला-रांगोळी स्पर्घेत- बाळ पंडित (प्रथम), दिलीप घारकर (द्वितीय) व ज्योती मारुलकर, अनुराधा रेडीज यांना उत्तेजनार्थ पारितोषिके जाहीर झाली.हस्तकला स्पर्धेत अश्विनी बोरगावकर, प्रथम व पूनम जाधव यांना द्वितीय क्रमांकाच्या मानकरी ठरल्या. व गीता तोरणे व नयना सिनकर यांना उत्तेजनार्थ पारितोषिके जाहीर झाली. ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने स्पर्धेचे आयोजन, अश्विनी बोरगावकर व अरुणा रसे यांनी केले. स्पर्धेचे परीक्षण -निमा पंकज सावे यांनी केले होते. स्पर्धेत ज्येष्ठ नागरिक संघाचे महिला-पुरुष मोठ्या संखेने सहभागी झाले होते.

1 comment:

  1. तुम्ही इतके भारी रांगोळीकार आहात हे माहीत नव्हतं पंडित साहेब. छान रांगोळी आहे. आपले मनापासून अभिनंदन!

    ReplyDelete

पत्रकारिता, निवेदन व समाजकार्याचा मानबिंदू ; ठाण्यात लक्ष्मीकांत पोपळे यांचा कौतुक सन्मान !!

पत्रकारिता, निवेदन व समाजकार्याचा मानबिंदू ;  ठाण्यात लक्ष्मीकांत पोपळे यांचा कौतुक सन्मान !! ठाणे प्रतिनिधी: ता.३, पत्रकारिता, ...