श्री पाणबुडी देवी कलामंचतर्फे विलेपार्ले येथील मा. दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात "बहुरंगी नमनचे" आयोजन !!
मुंबई, (दिपक कारकर /शांताराम गुडेकर) :
कलेचे माहेरघर म्हणून संबोधल्या जाणाऱ्या "कोकणातील" प्रत्येक कोकणी माणसाला वेड लावणारी, कोकणी कलेचा नावीन्यपूर्ण साज आणि बदलत्या काळानुसार पुरुष पात्रमय नमन कलेत कालपरत्वे बदल होत, "व्यावसायिक "स्त्री-पुरुष" पात्रांनी" नटलेली वैशिष्ट्यपूर्ण लोककला "कोकणचे खेळे-अर्थात बहुरंगी नमन" असा सदाबहार कार्यक्रम मुंबईस्थित कोकणी माणसाला बुधवार दि.९ फेब्रुवारी २०२२ रोजी मुंबईच्या विलेपार्ले पूर्व येथील मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात रात्री ७:३० ते १० या वेळेत कुटुंबसमवेत पहायला मिळणार आहे. कोकण सुपूत्र, कलेच्या प्रवाहात आपली ओळख निर्माण करून, लोककला जतन-संवर्धन करणारे कलावंत शाहीर दिनेश मोरे आणि राहुल भडवळकर निर्मित "ओम साई नमन नाट्य मंडळ" ( मालाड-मुंबई ) यांचे "स्त्री-पात्रांनी" नटलेलं बहुरंगी नमन ( कोकणचे खेळे ) अशी नाविन्यपूर्ण कलाकृती सादर होणार आहे. पारंपारिक खेळे, भक्तिमय गण, नटखट गवळण सोबत नव्या संल्पनेतून साकारलेली, सध्यस्थीत परिस्थितीवर आधारित सामाजिक संदेश देणारी नाट्य कलाकृती (वगनाट्य) न "मान अंगावर आलाय" प्रेक्षकांची मन जिंकून जाणार आहे. सुंदर नृत्य कलाआविष्कार, उत्तम काव्य रचनेतून साकारलेली नव-नवीन कर्णमधुर आणि सुमधुर गोड आवाजाचे लोकप्रिय शाहीर रविंद्र भेरे सह शाहीर सचिन धुमक, गायिका शिवण्या मांडवकर यांच्या मधुर आवाजातून गायली जाणारी गाणी रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारी आहेत.या नमन प्रयोगातून झी मराठी, कलर्स मराठी, स्टार प्रवाह वाहिनीवर लहान-मोठ्या भूमिका साकारणारा कलाकार विनायक सकपाळ मावशीच्या भूमिकेत प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे. सहगायक म्हणून निलेश आगरे, कृणाल गोवरे, गायिका जागृती धोपट यांची साथ गायनाला लाभणार आहे. कार्यक्रमाचे लेखक/गीतकार शाहीर राजेंद्र टाकळे, दिग्दर्शन शाहीर प्रविण कुळये,सूत्रधार - सुरेश बांद्रे, रामचंद्र भडवळकर, सुशांत भुवड,मृदुंगमणी- विशाल मांजरेकर, दिपक तांबे,ऑर्गन - महेंद्र फटकरे ,बेन्जो-सुरज वेले, ऑक्टोपॅड - स्वप्नील गुरव, कला संकल्पना - प्रविण पाष्टे सह रुषाल मोरे, रंगभूषा - सुहास धनावडे, सिद्धेश सरमलकर आणि नमन मंडळाचे "पुरुष-महिला" कलाकार यांच्या ताफ्यात हा सदाबहार कार्यक्रम मुंबई रंगभूमीवर मोठ्या जल्लोषात व श्री.पाणबुडी देवी कलामंचातर्फे नेत्रदीपक नियोजनबद्ध आयोजनात कोव्हिड -१९ च्या नियमांनुसार सायंकाळी ०७ : ३० ते १० वा.या वेळेत संपन्न होणार आहे. कार्यक्रमच्या अधिक माहितीसाठी महेश वीर- ९६९९२१५०३५, संतोष घाणेकर - ९८३३६८९६४२, अनंत गोताड - ९८९२९६०५३८, दिपक कारकर - ९९३०५८५१५३ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

No comments:
Post a Comment