कल्याण पोलीस विभागाकडून उल्लेखनीय कामगिरी !! "हरविलेल्या ३२ मोबाईलचा शोध ; सर्व स्तरातून अभिनंदन"
कल्याण, हेमंत रोकडे : कल्याण विभाग सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याण यांच्या अंतर्गत असलेले महात्मा फुले चौक, बाजारपेठ, खडकपाडा व कोळसेवाडी पोलीस या हद्दीतील कल्याण डोबिवली तसेच कल्याण रेल्वे स्टेशन या ठिकाणी बाहेर जिल्हयातुन येणारे लोकांचे सन २०१९, २०२०, २०२१ या कालावधीत वेगेवगळ्या कंपनीचे मोबाईल गहाळ झाल्याने त्यांनी दिलेल्या तक्रारी वरून संबंधीत पोलीस ठाण्यात प्रॉप्रटी मिसिंग अन्वये तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या.
या हरविलेल्या मोबाईलचा तांत्रीक माहितीच्या आधारे शोध घेणे बाबत अपर पोलीस आयुक्त दत्ता कराळे पुर्व प्रादेशिक विभाग कल्याण, पोलीस उप आयुक्त सचिन गुंजाळ परिमंडळ-३, सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याण विभाग यांनी दिलेल्या योग्य त्या सुचना व मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याण विभागाने यांचे अधिन असलेला वाहन व मोबाईल चोरी विरोधी पथकाचे एच.जी.ओऊळकर, पवार, गायकवाड, वाघ,वळवी, चव्हाण यांनी तांत्रिक माहितीच्या आधारे शोध घेवुन अंदाजे एकुण ४,५०,०००/- किंमतीचे ३२ हरविलेल्या मोबाईलचा शोध घेवुन सदरचे मोबाईल तक्रारदार यांना परत देण्यात आले आहेत.
या सदरची कौतुकस्पद कामगिरी अपर पोलीस आयुक्त , सहाय्यक पोलीस आयुक्त उमेश माने-पाटील यांचे मार्गदर्शनखाली वरिष्ठ पोलीस निरिक्षक हणमंत ओऊळकर, गायकवाड, चव्हाण यांनी केलेली आहे.






No comments:
Post a Comment