काँग्रेस पार्टीच्या घाटकोपर पश्चिम पदाधिकारीतर्फे सार्वजनिक शौचालयच्या मागणीचे एन सहाय्यक आयुक्त यांना निवेदन !!
मुंबई, (शांताराम गुडेकर) :
महानगर पालिकेच्या एन वार्डच्या अधिपत्यात येणाऱ्या घाटकोपर पश्चिम विभागातील अमृत नगर सर्कल येथे सार्वजनिक शौचालयची मागणी करणारे निवेदन घाटकोपर पश्चिम काँग्रेस पार्टीच्या पदाधिकारी यांच्यातर्फे महानगर पालिका एन वार्ड सहाय्यक आयुक्त सोनावणेसाहेब यांना देण्यात आले.यावेळी ईशान्य मुंबई जिल्हा काँग्रेस अध्यक्ष रॉय मणी, ब्लॉक अध्यक्ष खलील खोत यांच्यासह नासीर खान, हरीश धात्रट, समीर एकतार, डॉ. पांडये, प्रेम यादव, बाबुभाई, मनोज राजभर, आणि अन्य पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते. मार्केट, बस मार्ग, अमृत नगर बस स्थानक, पोलीस बिट, रिक्षा स्टॅन्ड, दुकानदार, हॉस्पिटल यांच्यासह वाढती लोकसंख्या, ये -जा करणारे हजारो प्रवाशी, स्थानिक नागरिक यांची गैरसोय लक्षात घेता अमृत नगर येथे सार्वजनिक शौचालयची आवश्यकता आहे. काँग्रेस पदाधिकारी यांनी दिलेल्या निवेदन याचा विचार करत लवकरच येथे सार्वजनिक शौचालय व्हावे अशी मागणी जोर धरत आहे.

No comments:
Post a Comment