Saturday, 15 January 2022

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ संलग्न संस्था कास्ट्राईब कर्मचारी महासंघ महाराष्ट्र कार्याध्यक्ष पदी डॉ. चंद्रकुमार बडोले यांची नियुक्ती !!

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ संलग्न संस्था कास्ट्राईब कर्मचारी महासंघ महाराष्ट्र कार्याध्यक्ष पदी डॉ. चंद्रकुमार बडोले यांची नियुक्ती !!


       बोरघर / माणगांव, (विश्वास गायकवाड) : शुक्रवार दिनांक 14/4/2022 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्र शास्त्र विद्यापीठ लोणेरे रायगड येथे कास्ट्राईब कर्मचारी महासंघाची सभा आयोजीत करण्यात आली होती. सदर सभेमध्ये डॉ. चंद्रकुमार मुकुंदाजी बडोले यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्र शास्त्र विद्यापीठ लोणेरे आणि त्यांच्याशी संलग्न असलेल्या संस्थांतील कास्ट्राईब कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्याच्या  "कार्याध्यक्ष" पदी नियुक्ती करण्यात आली.
      सदर नियुक्ती पत्र संघटनेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष मा. रवींद्र पालवे सर, अति. सरचिटणीस मा. सुरेश तांबे साहेब आणि मा. अरविंद सोनावणे सरचिटणीस विद्यार्थी कर्मचारी संघ ह्यांच्या हस्ते देण्यात आले. सभेस विद्यापीठातील बरेच कर्मचारी, प्रामुख्याने डॉ. नेटके सर, आव्हाड मॅडम, म्हाप्रोळकर मॅडम, मा. अनिल गोरेगावकर आदी उपस्थित होते.

डॉ. चंद्रकुमार बडोले सरांच्या ह्या नियुक्तीचे सर्व स्तरातून स्वागत आणि अभिनंदन होतं आहे. विदयापीठ आणि संलग्न संस्था मधील आरक्षणाचे प्रश्न आणि विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे प्रश्न प्रधान्याने मार्गी लावणार असे डॉ. चंद्रकुमार बडोले सर ह्यांनी अभिवचन दिले.
        डॉ बाबासाहेब आंबेडकर तंत्र शास्त्र विद्यापीठ लोणेरे रायगड संलग्न संस्था कास्ट्राईब महासंघ महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष पदावर डॉ. चंद्रकुमार बडोले यांची नियुक्ती झाल्याने त्यांच्या हितचिंतक, समर्थक आणि मित्र परिवारात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांच्या वर सोशल मीडिया, वॉट्सअप, फेसबुक, इन्स्टाग्राम आणि प्रत्यक्ष त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेऊन व दूरध्वनीवरून संपर्क साधून त्यांच्या वर अभिनंदनीय वर्षाव सुरू केला आहे.

No comments:

Post a Comment

लग्नाच्या बाजारात हुंड्याचा लिलाव; पुरोगामी महाराष्ट्राला लागलेली सामाजिक कीड सुशिक्षित समाजातही ‘हुंडा’ अजूनही जिवंत — कायदे कागदावर, वास्तव भयावह

लग्नाच्या बाजारात हुंड्याचा लिलाव; पुरोगामी महाराष्ट्राला लागलेली सामाजिक कीड सुशिक्षित समाजातही ‘हुंडा’ अजूनही जिवंत — कायदे कागदावर, वास्त...