संतापजनक ! पुन्हा सुरू झालेल्या एसटी वर दगडफेक, प्रवासी थोडक्यात बचावले !!
कल्याण, बातमीदार : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींना तोंड द्यावं लागत आहे. अशातच अजूनही कर्मचाऱ्यांचा संप काही मिटेना. त्यामुळे सरकारनंही कडक पावलं उचलायला सुरुवात केली आहे. सरकारनं अनेकदा अल्टिमेटम देऊनही कर्मचारी एकत नसल्यानं आता त्यापुढचे मोठे पाऊल उचलत नव्याने भरती प्रक्रिया सुरु केली आहे.
अशातच अकोला जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा तिढा सुटत नसल्याचं चित्र असतानाच अकोला आगाराची बस एमएच ४० - ५८०८ वर अज्ञात व्यक्तींकडून दगडफेक करण्यात आली.
या घटनेतून प्रवासी थोडक्यात बचावले आहेत. अशा दगडफेकीमुळे मुळे कामावर परत आलेल्या चालक वाहक व प्रवाशांमध्ये एक प्रकारची असुरक्षितता निर्माण झाली आहे.
या दगडफेकीमध्ये ड्रायव्हर साईटची बसची काच फुटली आहे. दगडफेक करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस याविषयी अधिक तपास करत आहेत.
एसटी कर्मचारी कामावर आले नाहीत तर आम्हाला कारवाई करण्याशिवाय अन्य कोणताही पर्याय उरणार नाही, असं राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांनी वारंवार स्पष्ट केलं आहे.
दिवसेंदिवस हा संप चिघळतच चालला आहे. त्यामुळे सगळीकडे चिंतेचे वातावरण निर्माण झालं आहे. यातच काही आगारांनी संप मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. तर काही आगारातील कर्मचारी अजूनही संप मागे घेण्यास तयार नाहीत.
प्रतिक्रिया :-
कर्मचा-यांनी आता कामावर यायला हवं, त्यातच त्यांच आणि समाजाचही हित आहे. वेतनवाढ दिली, 'विलीनीकरण' न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून आहे, तर वेतनातील तृटींबाबत चर्चेची द्वारे खुली असल्याचे अनेकदा सांगण्यात आलं आहे, कामावर येण्यासाठी चार वेळा अल्टिमेटम देवून झाला, आता हजर होणा-या कर्मचा-यांवर कोणतीही कारवाई केली जाणार नाही, असे महामंडळाने स्पष्ट केले आहे. आपली लढाई आपण आपली नोकरी वाचवून लढू शकतो, आपल्या कुटूंबाचा विचार करुन कर्मचाऱ्यांनी आता कामावर रुजू व्हायला हवं. - 'विजय गायकवाड', आगार व्यवस्थापक, कल्याण आगार.

No comments:
Post a Comment