Tuesday, 4 January 2022

सावित्रीबाई फुलेंना विद्यार्थीनीनी दिली मानवंदना :

सावित्रीबाई फुलेंना विद्यार्थीनीनी दिली मानवंदना :


मुंबई, (शांताराम गुडेकर) :

              क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती काल देशभर साजरी करण्यात आली. महिलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी सावित्रीबाईनी खूप हाल सोसले. प्रसंगाला शेणाचे गोळे देखील झेलले मात्र शिक्षणाचा विडा त्यांनी सोडला नाही. भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या प्रेरणेने अनेक क्षेत्रे महिलांनी गाजवली आहेत.
         सावित्रीबाई फुले यांची जयंती म्हणजे महिलांसाठी प्रेरणा दिवस आहे. घाटकोपर च्या श्रीमती पी एन दोशी महिला महाविद्यालयात प्राचार्य आशा मेनन यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मास मीडियाच्या निमिषा कांबळे यांच्या वतीने विद्यार्थिनीनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन केले. यावेळी आज जगात विविध क्षेत्रात महिला करियर करत आहेत. अशा डॉक्टर, सैनिक, इंजिनियर, शिक्षिका, पोलीस आदी क्षेत्रातील वेषभूषेत विद्यार्थीनीनी पेहराव करत शिक्षणाच्या प्रवाहात आणणाऱ्या सावित्रीबाई फुले यांना एकत्रित मानवंदना दिली.

No comments:

Post a Comment

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !!

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !! उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : ...