Wednesday 19 January 2022

मुरबाड नगरपंचायतवर पून्हा एकदा भाजपाचा झेंडा !! **दिग्गजांना पराभवाचा फटका !**

मुरबाड नगरपंचायतवर पून्हा एकदा भाजपाचा झेंडा !! 

**दिग्गजांना पराभवाचा फटका !** 


मुरबाड, (मंगल डोंगरे) : मुरबाड नगरपंचायतच्या  नुकताच झालेल्या २०२१-२२ सार्वत्रिक निवडणुकीत पून्हा एकदा भाजपाने आपली सत्ता राखली असून मुरबाड करांनी विकासाला साथ दिल्याने पुन्हा एकदा भाजपाचा झेंडा फडकला आहे. भाजप व शिवसेना यांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या या निवडणुकीत भाजपा चे १०, शिवसेना - ०५ तर अपक्ष ०२ असे पक्षिय बलाबल असून शिवसेनेने सूद्धा चांगली मुसंडी मारलेली दिसत आहे. 


यावेळी निवडणुकीत प्रचारासाठी शिवसेनेकडून  पालकमंञी एकनाथ शिंदे, प्रकाश पाटिल, सुभाष पवार , कांतीलाल कंटे प्रचारात उतरले होते. तर भाजपाचे केंन्द्रीय मंञी कपिल पाटील, आमदार किसन कथोरे यांनी स्वतः प्रचाराची धुरा सांभाळली होती. प्रचारात दोन्ही पक्षाकडून श्रेयासाठी आरोप - प्रत्यारोप झाले असले तरी मुरबाड करांनी विकासाला पून्हा कौल दिला आहे. मागिल निवडणुकीत काँग्रेसचा एक नगरसेवक निवडून आला होता. परंतु यावेळेस एकही उमेदवाराला मतांची पन्नाशी गाठता आली नसून राष्ट्रवादी काॕंग्रेस , मनसे, प्रहार जनशक्ती पार्टीला खाते सूद्धा उघडता आले नसल्याने मतदारांनी या पक्षांना साफ नाकारले आहे. 


तर मतदारांनी काही दिग्गज उमेदवारांना नाकारले असून माजी नगराध्यक्ष पद भुषविलेले प्रभाग क्रंमाक ५ मधून किसन अनंत कथोरे व प्रभाग क्र, ७ मधुन  माजी नगराध्यक्षा शितल तोंडलीकर यांच्या सह माजी उपनगराध्यक्ष नारायण गोंधळी यांनाही पराभव पत्कारावा लागला आहे. प्रभाग क्र. १ व १७ मधे अपक्षांनी मुसंडी मारली असून इथे सुद्धा भाजपाचे उमेदवार पराभूत झाले आहेत.                        

एकंदरीत मुरबाडकरांनी केंन्द्रीय मंञी कपिल पाटील व आमदार किसन कथोरे यांच्यावर विश्वास दाखवत पून्हा एकदा भाजपाच्या हातात सत्ता दिली असून,मागील निवडणुकीत खातेही न खोलणा-या शिवसेनेला किमान  विरोधी पक्ष म्हणून बसण्याची संधी मिळाली आहे.    ** आजचे  विजयी उमेदवार ** प्रभाग : क्र. १) दिक्षीता भरत वारे (अपक्ष), २) मानसी मनोज देसले (भाजपा), ३) रामचंद्र भगवान दुधाळे (भाजपा),  ४) नम्रता नंदकुमार जाधव ( भाजपा ) ५) विनोद रामचंद्र नार्वेकर ( (शिवसेना), ६) नम्रता नितीन तेलवणे (शिवसेना), ७) अक्षय नंदकुमार रोठे (शिवसेना), ८) उर्मिला सुजित ठाकरे (भाजपा), ९) रविना विनायक राव (भाजपा), १०) मोनिका स्वप्नील शेळके (शिवसेना), ११) मुकेश बबन विशे (भाजपा), १२) मोहन भालचंद्र गडगे (भाजपा), १३) संतोष दिलीप चौधरी (भाजपा), १४) नितीन लक्ष्मण तेलवणे (शिवसेना), १५) मधुरा मोहन सासे (भाजपा), १६) स्नेहा राजन भोईर - चंबावणे (भाजपा), १७) अनिता भगवान दुधाळे (अपक्ष) या प्रमाणे नवनिर्वाचित नगरसेवक म्हणून या चेह-याना संधी मिळाली आहे.


*मुरबाड नगरपंचायत निकाल २०२२*
*प्रभाग क्र. १*
१) खारीक गिरजाबाई वसंत - १५४
२) खाटेघरे दिपिका दिपक - २०८
*३) वारे दीक्षिता भरत - २८७.- अपक्ष*
४) विश्वासराव स्वप्नाली संतोष - ११
५) नोटा - ५
-----------------------------------------------
*प्रभाग क्र. २*
१) जोशी मेघना तुषार - ४
२) थोरात नम्रता लूकस - ५
*३) देसले मानसी मनोज - ४१४.-भाजपा*
४) शेळके नंदा अर्जुन - २२२
५) नोटा - ४
-----------------------------------------------
*प्रभाग क्र. ३*
१) गायकर शंकर चंद्रकांत - ६१
२) जोशी मेघना तुषार - २
३) देसले नरेश शांताराम - १२
*४) रामभाऊ दुधाळे - ३७१.- भाजपा*
५) शेळके अर्जुन काथोड - ३११
६) शेळके रविंद्र वामन - ३२
७) सावंत प्रथमेश प्रमोद - १८
८) हुमणे उमेश दत्तात्रय - ३५
९) नोटा - ४
-----------------------------------------------
*प्रभाग क्र. ४*
१) चन्ने सुवर्णा राजेन्द्र - ६१
*२) जाधव नम्रता नंदकुमार - १५३.- भाजपा*
३) देसले सुवर्णा भाऊ - ७२
४) नोटा - २
-----------------------------------------------
*प्रभाग क्र. ५*
१) कथोरे किसन अनंत - २५८
*२) नार्वेकर विनोद रामचंद्र - ४५९.- सेना*
३) पाटील एस एल - १
४) नोटा - २
-----------------------------------------------
*प्रभाग क्र. ६*
१) जाधव दर्शना महेश - ६९
२) जाधव मयूरी नीलेश - ३११
*३) तेलवणे नम्रता नितिन - ५९७.- सेना*
४) भराडे शुभांगी शशांक - १७
५) नोटा - २
-----------------------------------------------
*प्रभाग क्र. ७*
१) जाधव योगेश गणपत - ३
२) तोडंलीकर शीतल दिनेश - २९५
३) थोरात किरण लूकस - १
*४) रोठे अक्षय नंदकुमार - ४०६.- सेना*
५) नोटा - ५
-----------------------------------------------
*प्रभाग क्र. ८*
१) खड़कबाण विलास गोपाळ - २३८
२) गायकवाड़ किशोर कैलास - १६
३) जाधव जगदीश पांडुरंग - ८
*४) ठाकरे उर्मिला सुजीत - ३८७.- भाजपा*
५) पावडे रूपेश सुरेश - ३
६) नोटा - १
-----------------------------------------------
*प्रभाग क्र. ९*
*१) राव रवीना विनायक - २९८.- भाजपा*
२) रोठे सिमा मिलिंद - १२३
३) नोटा - ४
-----------------------------------------------
*प्रभाग क्र. १०*
१) घरत वैशाली तानाजी - १४९
२) चिराटे मंदा एकनाथ - १४
*३) शेळके मोनिका स्वप्निल - ४४६. - सेना*
४) नोटा - ५
-----------------------------------------------
*प्रभाग क्र. ११*
१) कोर श्रीकांत पांडुरंग - ३००
२) मोरे नरेश सदानंद - २०
*३) विशे मुकेश बबन - ३३३. - भाजपा*
४) नोटा - ५
-----------------------------------------------
*प्रभाग क्र. १२*
१) खुणे मोहन अनंता - २
*२) गडगे मोहन भालचंद्र - ३९२. - भाजपा*
३) माळी चिंतामण नारायण - ३९०
४) नोटा - ६
-----------------------------------------------
*प्रभाग क्र. १३*
१) गुजर योगेश पुरषोत्तम - २७
*२) चौधरी संतोष दिलीप - ४७८. - भाजपा*
३) तेलवणे प्रशांत चंद्रकांत - १
४) पुरोहित हरेश गणेश - ३२३
५) भोईर विजय विष्णु - ४
६) नोटा - ७
----------------------------------------------
*प्रभाग क्र. १४*
१) जाखोटिया जुगलकिशोर ज - १८४
२) जाधव देवेंद्र अशोक - २५
*३) तेलवणे नितिन लक्ष्मण - २६५. - सेना*
४) तेलवणे सुधीर बाळकृष्ण - १२१
५) नोटा - ७
-----------------------------------------------
*प्रभाग क्र. १५*
१) नवले सीता गणपत - १०
२) भोईर जानव्ही जगदीश - २६७
*३) सासे मधुरा मोहन - ७५२. - भाजपा*
४) नोटा - ९
-----------------------------------------------
*प्रभाग क्र. १६*
१) झळके रंजना विनायक - ५
*२) भोईर स्नेहा राजन - ३६३.- भाजपा*
३) शेलार अंजना यशवंत - २२७
४) नोटा - ११
-----------------------------------------------
*प्रभाग क्र. १७*
१) कराळे राधिका मोहन - ७
२) गोंधळी वनिता नारायण - ४२५
*३) दुधाळे अनिता भगवान - ४७१. अपक्ष*
४) बोष्टे माधवी मुकेश - १०
५) वड़वले धन्वंतरी दशरथ - ४
६) नोटा - ४
-----------------------------------------------

*भाजपा - १०. शिवसेना - ०५. अपक्ष - ०२*

No comments:

Post a Comment

मतदारसंघांतील गेल्या दहा वर्षातील महायुतीची विकासाची कामे जनतेपर्यंत पोहोचवा - श्रीकांत शिंदे

मतदारसंघांतील गेल्या दहा वर्षातील महायुतीची विकासाची कामे जनतेपर्यंत पोहोचवा - श्रीकांत शिंदे  डोंबिवली, सचिन बुटाला : कल्याण पू...