Sunday, 16 January 2022

छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक जयंती महोत्सव समिती तर्फे सॅनिटायझर, मास्क, दैनंदिन नोंद वह्यांचे वाटप !!

छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक जयंती महोत्सव समिती तर्फे सॅनिटायझर, मास्क, दैनंदिन नोंद वह्यांचे वाटप !!



अंबरनाथ, बातमीदार :

             छत्रपती संभाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त आज शिवाजीनगर पोलीस स्टेशन, अंबरनाथ पोलीस स्टेशन,  ट्रॅफिक कार्यालय यांना भेट देऊन छत्रपती शिवाजी महाराज जयंती महोत्सव समिती मार्फत स्यानिटायझर, मास्क व दैनंदिन नोंदवह्या यांचे  शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे "वरिष्ठ पोलीस निरीक्षक भोंगे साहेब" व अंबरनाथ पोलीस स्टेशनचे "वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.राजेंद्र कोते साहेब" व त्यांचे सहकारी 'पो.नि.(गुन्हे) श्री.जनार्दन सोनावणे साहेब', पी आय श्री.पंकज जाधव साहेब, ए पी आय श्री.संदीप भालेराव साहेब, पी एस आय श्री.रमेश गाडवे साहेब व  गुन्हे शाखेचे पो. हवा. श्री.मधुकर म्हसे आणि त्यांचे सहकारी साहेब, वाहतुक विभागाचे "वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.सुखदेव पाटील साहेब" व श्री.पाटोळे साहेब, आणि गवळी साहेब यांच्या कडे सुपुर्द करण्यात आले.




        पोलीस विभाग हा देशाच्या कण्यामधील एक मणी आणि हे सर्व मान्यवर आणि त्यांचे सर्व सहकारी सध्या कोरोनाचा ओमिक्रोन वायरस याच्या विरोधात जिवाची पर्वा न करता काम करून आपले संरक्षण करत  आहेत. हा विभाग जास्तीत जास्त सुरक्षित राहावा यासाठी आपली नैतिक जबाबदारी स्वीकारून याच दृष्टिकोनातून छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक उत्सव समिती तर्फे यांचे वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला.
    
सर्व पोलीस दलाचे ते करत असलेल्या सेवेबद्दल समितीतर्फे आभार मानण्यात आले.

No comments:

Post a Comment

लग्नाच्या बाजारात हुंड्याचा लिलाव; पुरोगामी महाराष्ट्राला लागलेली सामाजिक कीड सुशिक्षित समाजातही ‘हुंडा’ अजूनही जिवंत — कायदे कागदावर, वास्तव भयावह

लग्नाच्या बाजारात हुंड्याचा लिलाव; पुरोगामी महाराष्ट्राला लागलेली सामाजिक कीड सुशिक्षित समाजातही ‘हुंडा’ अजूनही जिवंत — कायदे कागदावर, वास्त...