पोलिसांच्या जीवावर उठले के.डी.एम महापालिकेचे बेकायदेशीर शौचालय !!
"स्मार्ट सिटीत उभारणी होतीय गटारावर"
कल्याण, हेमंत रोकडे : दि. १५/०१/२०२२
कल्याण सत्र न्यायालयाच्या बाजूला आणि एसीपी कार्यालयाच्या समोर रेल्वे स्टेशन परिसर स्मार्ट सिटी प्रकल्पात समावेश असतांना केडीएमसी च्या कृपेने गटारावर शौचालय उभारण्याची बेकायदेशीर कृत्य करताना दिसत आहे. आधी वाहतूक पोलीस प्रदूषणाने त्रस्त असतांना पोलिसांच्या कार्यालयासमोर शौचालयाचे बांधकाम करून पोलिसांच्या जीवावर उठले आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे क" प्रभाग कार्यालयाला सहाय्यक पोलीस आयुक्त वाहतूक विभाग चे मंदार धर्माधिकारी यांनी तक्रार केली आहे
कल्याण डोंबिवली महापालिकेचे काही परिसर स्मार्ट सिटी प्रकल्पात प्रस्तापित आहे त्यातील रेल्वे स्टेशन परिसर आणि सभोवतालील भागाचा समावेश आहे असे असताना चक्क पालिकेने रस्त्यात बाधित झालेल्या शौचालय पुन्हा तोडल्या नंतर त्या कल्याण कोर्टाच्या बाजूला आणि एसीपी आणि वाहतुक पोलीस कार्यलयासमोर बेकायदेशीर शौचालय बांधण्याचा घाट घातला आहे त्यामुळे आधीच वाहतूक पोलीस प्रदूषणाने त्रस्त असंतांना त्यांच्या कार्यालयासमोर शौचालय उभारून पालिका पोलिसांच्या जीवावर उठले आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहेआणि अनेक सामाजिक संघटना यांनी तक्रारी केल्या आहेत दरम्यान याबाबत आता सहाय्यक पोलीस आयुक्त वाहतूक विभागाचे मंदार धर्मधिकारी यांनी पालिकेच्या क " प्रभाग कार्यालयाला अर्ज करून त्या जागेवर शौचालय उभारू नये यासाठी तक्रार केली आहे. 'क' प्रभाग कार्यालयाने ही पर्याय म्हणूं न रेल्वे स्टेशन परिसरात फिरते शौचालय ठेवून वादावर आणि बेकायदेशीर बांधकाम करून नये अशी मागणी होऊ लागली आहे आणि अनेक सामाजिक संघटना स्मार्ट सिटी प्रकल्प परिसरात प्रस्तावित असताना गटारावर शौचालय उभारू नये आणि काही अंतरावर स्मार्ट शौचालय उभारावे आणि रेल्वे स्टेशन परिसराची शोभा वाढवावी.

No comments:
Post a Comment