Sunday, 16 January 2022

भाजप नगरसेवक सचिन खेमाला पोलिसांनी केली अटक कल्याण व्यापारी खंडणी व जीवघेणा हल्ला प्रकरणी !! "राजकीय दबावाने गुन्हा दाखल केल्याचा आरोप"

भाजप नगरसेवक सचिन खेमाला पोलिसांनी केली अटक
कल्याण व्यापारी खंडणी व जीवघेणा हल्ला प्रकरणी !!

"राजकीय दबावाने गुन्हा दाखल केल्याचा आरोप"


कल्याण, हेमंत रोकडे : व्यापाऱ्यावर खंडणीसाठी प्राणघातक केल्या प्रकरणी केडीएमसीचा माजी नगरसेवक सचिन खेमा याला महात्मा फुले पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून या प्रकरणातील चार फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

5 जानेवारी रोजी पहाटे कल्याणमधील व्यापारी अमजद सय्यद याच्यावर काही जणांनी प्राण घातक हल्ला केला होता. या हल्ल्यात सय्यद गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर कल्याणच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या हल्ल्यात भाजप नगरसेवक सचीन खेमा याचा भाऊ नितीन खेमा, बबलू मजिद, प्रेम चौधरी व सतीश पोकळ नावाचा एक तरुण सहभागी होता. सचीन खेमा यांच्या सांगण्यावरून हा हल्ला झाल्याचे पोलीस तपासात उघड झाले. या प्रकरणाचा तपास महात्मा फुले पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील करत आहेत. सचिन यांनी किरकोळ वादातून एका तरुणाला मारहाण केली होती. या तरुणाला अमजद याने पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास मदत केली. याचाच राग मनात धरून अमजद वर हल्ला करण्यात आला. इतकेच नव्हे तर अमजद कडून पैसे देखील मागण्याचा आरोप झाला होता .या प्रकरणी महात्मा फुले पोलीस अधिक तपास करत आहेत .सचिन खेमा याच्यासह सतीश पोकळ याला अटक करण्यात आली आहे .इतर फरार आरोपींचा शोध सुरू आहे मात्र भाजप नगर सेवकांच्या अटकेनंतर कल्याण-डोंबिवली परिसरात राजकारण तापले असून राजकीय दबावामुळे गुन्हा दाखल केल्याचे आरोप नगरसेवकांच्या घरच्यांनी केला आहे

No comments:

Post a Comment

लग्नाच्या बाजारात हुंड्याचा लिलाव; पुरोगामी महाराष्ट्राला लागलेली सामाजिक कीड सुशिक्षित समाजातही ‘हुंडा’ अजूनही जिवंत — कायदे कागदावर, वास्तव भयावह

लग्नाच्या बाजारात हुंड्याचा लिलाव; पुरोगामी महाराष्ट्राला लागलेली सामाजिक कीड सुशिक्षित समाजातही ‘हुंडा’ अजूनही जिवंत — कायदे कागदावर, वास्त...