Sunday, 16 January 2022

वसई -विरार येथे संपत्तीच्या वादातून भावाचा बहिणीवर कोयत्याने वार !!

वसई -विरार येथे संपत्तीच्या वादातून भावाचा बहिणीवर कोयत्याने वार !!


भिवंडी, दिं,16, अरुण पाटील (कोपर) :
                वसई -विरार पश्चिम येथील भाजी मार्केट परिसरात एक थरारक घटना समोर आली आहे. येथील एका भावाने संपत्तीच्या वादातून आपल्या बहिणीवर कोयत्याने सपासप वार केल्याची थरराक घटना  समोर आली  असून सोशल मीडियात वेगाने व्हायरल होतं आहे. संबंधित घटना 13 जानेवारी रोजी माया निवास या ठिकाणी घडली आहे. परिसरातील एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही घटना कैद झाली आहे. या प्रकरणी विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल  करण्यात आला असून पोलिसांनी आरोपी भावाला अटक  केली आहे.
               राजू माया (वय -55 )असं अटक करण्यात आलेल्या आरोपी भावाचं नाव आहे. तो विरार पश्चिम येथील भाजी मार्केट परिसरातील रहिवासी आहे. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी भाऊ राजू माया याचं गेल्या काही काळापासून आपल्या बहिणीसोबत वाद सुरू होता. राहत्या घरच्या भिंतीवरून त्यांच्यात वाद झाला होता. याच वादातून आरोपी राजू याने 13 जानेवारी रोजी आपली बहिणी स्मिता शहा यांच्या घरात घुसून तिच्यावर कोयत्याने वार करून तिला गंभीर जखमी केले.
            एका शेजारील महिलेनं जखमी स्मिता शहा यांना कपड्यात गुंडाळून संजीवनी रुग्णालयात दाखल केले असून याठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू असून  या घटनेचा अधिक तपास विरार पोलीस करत आहेत.

No comments:

Post a Comment

लग्नाच्या बाजारात हुंड्याचा लिलाव; पुरोगामी महाराष्ट्राला लागलेली सामाजिक कीड सुशिक्षित समाजातही ‘हुंडा’ अजूनही जिवंत — कायदे कागदावर, वास्तव भयावह

लग्नाच्या बाजारात हुंड्याचा लिलाव; पुरोगामी महाराष्ट्राला लागलेली सामाजिक कीड सुशिक्षित समाजातही ‘हुंडा’ अजूनही जिवंत — कायदे कागदावर, वास्त...