Sunday, 16 January 2022

वर्धा येथील अवैध गर्भपात प्रकरणात अखेर डॉ. कदमांना अटक, रुग्णालयात सापडले 12 कवट्या, आणि 54 हाडे !!

वर्धा येथील अवैध गर्भपात प्रकरणात अखेर डॉ. कदमांना अटक, रुग्णालयात सापडले 12 कवट्या, आणि 54 हाडे !!


भिवंडी, दिं,16, अरुण पाटील, (कोपर) : वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथील गर्भपात प्रकरणात कदम हॉस्पिटलचे डॉ. कदम यांना अखेर अटक करण्यात आलं आहे. या प्रकरणात आतापर्यंत पाच जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. डॉ. कदम यांना अद्याप अटक करण्यात आलं नव्हतं. मात्र आता पोलिसांनी आपल्या तपासाचा वेग वाढवला असून डॉ. कदम यांना अटक केलं आहे. 

15 जानेवारी 2022 रोजी रात्री उशिरा डॉ. कदम यांना तब्यात घेण्यात आले आहे. विशेष म्हणजे या गर्भपात प्रकरणात रोजच नवनवे खुलासे होत आहेत. आर्वी येथील कदम हॉस्पिटलमध्ये बुधवारी म्हणजेच 12 जानेवारी रोजी बेकायदेशीर गर्भपात होत असल्याचे समोर आले होते. 

आर्वी शहरात असलेल्या कदम रुग्णालयात गर्भपात केंद्र आणि सोनोग्राफी सेंटर आहे. गर्भपात केंद्र हे डॉ.रेखा कदम यांच्या सासू डॉ. शैलेजा कदम यांच्या नावावर आहे. तर सोनोग्राफी सेंटर हे डॉ. रेखा कदम आणि डॉ.नीरज कदम या दोघांच्या नावाने आहे. या रुग्णालयात काही दिवसांपूर्वी एका अल्पवयीन मुलीचा गर्भपात करण्यात आला होता. हा प्रकार उघडीस आल्यानंतर मुलीच्या आई व वडिलांसह गर्भपात करणाऱ्या डॉ. रेखा कदम आणि 2 परिचारिका अशा एकूण 5 जणांना पोलिसांनी अटक केलं होतं. आता याच प्रकरणात मध्यरात्री डॉ. नीरज कदम यांना पोलिसांनी अटक केल्यामुळे आता आरोपींची संख्या सहावर पोहचली आहे.या अटके मुळे वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. 

डॉ. रेखा कदम यांची पोलीस कोठडीत चौकशी करण्यात येत आहे. त्यांनी आतापर्यंत दिलेल्या माहितीवरुन पोलिसांनी 12 जानेवारी रोजी रुग्णालय परिसरातील बायोगॅस चेंबरमध्ये 13 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या गर्भपाताचे भ्रुण शोधण्यासाठी तपासणी केली. याच दरम्यान पोलिसांना त्याच चेंबरमध्ये 12 कवट्या अन् 54 हाडं आढळून आली. त्यानंतर पोलिसांनी डॉ. रेखा कदम यांना सहकार्य करणाऱ्या दोन परिचारिकांनाही अटक केली आहे. शनिवारी मध्यरात्री 1 वाजून 45 मिनिटांनी या प्रकरणात डॉक्टर नीरज कदम यांना पोलिसांनी अटक केलं आहे. 

या कदम रुग्णालयाच्या गर्भपात केंद्राचा परवाना हा डॉ. शैलेजा कदम यांच्या नावे असल्याने त्यांनाही चौकशीसाठी सूचनापत्र पोलिसांनी बुधवारी दिले होते. मात्र, या दरम्यान शैलेजा कदम यांची प्रकृती खालावली. शुक्रवारी त्यांना नागपूर येथील खासगी रुग्णायलात उपचारासाठी दाखल केल्याची माहिती आहे. शनिवारी सकाळपासूनच कदम रुग्णालय परिसरात डॉ. नीरज कदम यांना सोबत घेत आर्वी पोलिसांसह आरोग्य विभागाच्या पथकाने तपासणी केली. 

या तपासा दरम्यान पोलिसांना कदम यांच्या घरात आरोग्य विभागाच्या पथकला काही औषधी आणि इंजेक्शनसुद्धा मिळाले असून ते आरोग्य विभागाने जप्त केले आहे.डॉ. कदम रुग्णालयात असलेल्या गर्भपात केंद्राचा परवाना हा डॉ. शैलेजा कदम यांच्या नावावर होता. डॉक्टर शैलजा कदम या रेखा कदम यांच्या सासू आहेत. तर सोनेग्राफी सेंटरचा परवाना डॉ. रेखा आणि डॉ. नीरज कदम यांच्या नावे होता. विशेष म्हणजे या सोनोग्राफी केंद्राच्या परवान्याची मुदत 19 डिसेंबर 2021 मध्येच संपली होती. परवाना नुतनीकरणासाठी त्यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांकडे प्रस्ताव पाठविला असून परवाना नुतनीकरण प्रक्रियेत आहे. मात्र, गर्भपाताचा कुठलाही परवाना नसताना डॉ. रेखा कदम यांनी गर्भपात केला कसा ? हा प्रश्न निर्माण होतो आहे"

No comments:

Post a Comment

लग्नाच्या बाजारात हुंड्याचा लिलाव; पुरोगामी महाराष्ट्राला लागलेली सामाजिक कीड सुशिक्षित समाजातही ‘हुंडा’ अजूनही जिवंत — कायदे कागदावर, वास्तव भयावह

लग्नाच्या बाजारात हुंड्याचा लिलाव; पुरोगामी महाराष्ट्राला लागलेली सामाजिक कीड सुशिक्षित समाजातही ‘हुंडा’ अजूनही जिवंत — कायदे कागदावर, वास्त...