Saturday, 15 January 2022

ह व ई प्रभागातील अनधिकृत बांधकामावर महापालिकाची धडक कारवाई !!

ह व ई प्रभागातील अनधिकृत बांधकामावर महापालिकाची धडक कारवाई !!


कल्याण, हेमंत रोकडे : कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे निर्देशानुसार व विभागीय उपायुक्त सुधाकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली ह प्रभागाचे सहा. आयुक्त अक्षय गुडधे यांनी डोंबिवली पश्चिम येथील नवापाडा, विशाल बिल्डिंगच्या बाजुला बांधकामधारक मयुर विलास कंदलगावकर यांच्या तळ आणि दोन मजली आर. सी सी इमारतीच्या चालू असलेल्या बांधकामावर निष्‍कासनाची धडक कारवाई  केली. 


सदर कारवाई अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे कर्मचारी, महापालिका पोलिस कर्मचारी, विष्णुनगर पोलिस स्टेशनचे पोलिस कर्मचारी यांचे मदतीने व एक् पोकलेन, तीन ब्रेकरच्या सहाय्याने करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे रवी बथानी यांची कोपर रेल्वे लाईनच्या पलीकडील अनधिकृत टपरी निष्कासनाची कारवाई देखील ह प्रभागाचे सहा. आयुक्त अक्षय गुडधे यांनी आज केली.


ई प्रभागातही सहा. आयुक्त भारत पवार यांनी नांदिवली, बामनदेव गल्ली येथील तळ मजल्याचे बांधकाम तोडण्याची कारवाई  महापालिकेचे पोलीस व कर्मचारी  यांच्या मदतीने केली.


No comments:

Post a Comment

लग्नाच्या बाजारात हुंड्याचा लिलाव; पुरोगामी महाराष्ट्राला लागलेली सामाजिक कीड सुशिक्षित समाजातही ‘हुंडा’ अजूनही जिवंत — कायदे कागदावर, वास्तव भयावह

लग्नाच्या बाजारात हुंड्याचा लिलाव; पुरोगामी महाराष्ट्राला लागलेली सामाजिक कीड सुशिक्षित समाजातही ‘हुंडा’ अजूनही जिवंत — कायदे कागदावर, वास्त...