Tuesday, 25 January 2022

कांबा येथील खदान बंद असल्याने शेकडो कामगारांवर उपासमारीची वेळ !! "लीज धारकांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान"

कांबा येथील खदान बंद असल्याने शेकडो कामगारांवर उपासमारीची वेळ !!

"लीज धारकांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान"



कल्याण, संदीप शेंडगे : कल्याण तालुक्यातील कांबा गावातील दगडी खदान काम गेल्या नऊ महिन्यांपासून बंद असल्याने शेकडो कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे.


कांबा गावाच्या हद्दीत डोंगराजवळ कांबा गावातील स्थानिक भूमिपुत्र व रहिवासी दगड खदानवर काम करून आपली उपजीविका चालविण्याचे काम करतात. या ठिकाणी सात क्रेशर मशीन आहेत. छोटे-मोठे मशीन वापरून दगड फोडण्याचे काम येथे सुरू असते. फोडलेला दगड घरांच्या बांधकामासाठी तसेच दगडा पासून खडी तयार करून ही खडी रस्ता व  बांधकामासाठी वापरली जाते यातून मिळणाऱ्या उत्पन्नावर येथील ७०० ते ८०० कुटुंब अवलंबून आहेत परंतु गेल्या नऊ महिन्यांपासून पठार पाडा वस्तीतील नागरिकांनी बेकायदेशीरपणे येथील खदान काम बंद केले असून कामगारांना दगड फोडण्यासाठी विरोध दर्शविला आहे.


येथील नागरीक खदान चालकांना व कामगारांना दमदाटी करीत असून खदान काम बंद केले नाही तर मारहाण करतात. 


पठार पाडा  येथील नागरिकांच्या दडपशाहीमुळे येथील शेकडो कामगारांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत असून ग्रामस्थांवर उपासमारीची वेळ आली आहे. ज्या ग्रामस्थांनी व व्यापाऱ्यांनी शासनाकडून रॉयल्टी भरून रीतसर खदान चालविण्यास परवाने घेतले आहेत. अशा व्यापाऱ्यांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान होत आहे. पठार पाडा येथील रहिवासी कोणत्याही प्रकारचे काम करू देत नसल्याने व्यापारी हवालदिल झाले आहेत आम्ही शासनाकडे कोट्यावधी रुपयांची रॉयल्टी भरणा केला असून काही आडमुठ्या रहिवाशांचा कामाला विरोध असल्याने शासनाचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे शासनाने मध्यस्थी करून हा प्रश्न सोडवावा अशी मागणी कांबा गावातील शेकडो ग्रामस्थांनी शासनाकडे केली आहे.

पठार पाडा येथील ग्रामस्थांना काम बंद करण्याचे कारण विचारले असता खदानच्यावर पठार पाड्यावर आमची घरे आहेत.

खदान मालक हे रात्री बेरात्री पहाटे डोंगरातील दगड फोडण्यासाठी बारूद लावून ब्लास्ट करीत आहेत मोठा आवाज होऊन जमीन हादरत आहे त्यामुळे आमच्या घरांना तडे जात आहेत. तसेच आमच्या पिण्याच्या पाण्यावर परिणाम झाला असून विहिरीचे पाणी आटले आहे. आमच्या घरांना नुकसान होत असल्याने या खदानी बंद कराव्यात म्हणून आम्ही शासनाकडे निवेदन दिले आहे असे येथील ग्रामस्थांनी सांगितले आहे. याबाबत व्यापार यांना विचारले असता पठार पाडाच्या बाजूला शासनाने मध्यस्थी करून आम्ही स्वखर्चाने पठार पाडा वस्तीतील नागरिकांना चांगली घरे बांधून दिली आहेत परंतु ते या घरांमध्ये राहावयास जात नसून केवळ त्रास देण्याच्या उद्देशातून काम बंद करीत आहेत. आम्ही पठार पाडा रहिवाशांच्या सर्व मागण्या पूर्ण करावयास तयार असून त्यांनी चर्चेने प्रश्न सोडविण्यास तयार व्हावे असे खदान चालकांनी स्पष्ट केले आहे.

पोलीस प्रशासनाने व शासनाने आमच्यावर होत असलेल्या अन्याय तातडीने दूर करावा गेल्या नऊ महिन्यांपासून बंद असलेले काम सुरू करून द्यावे कामगारांची उपासमार थांबवावी अशा मागण्यांचे निवेदन येथील खदान मालकांनी प्रांताधिकार्‍यांना व शासनाला दिले आहे. त्यामुळे शासनाने मध्यस्थी करून पठार पाडा येथील नागरिकांची समजूत घालून नऊ महिन्यांपासून बंद असलेली खदान सुरू करून सातशे ते आठशे कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा. शासन प्रशासन या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देते की नाही. उपासमार सुरू असलेल्या कामगारांना न्याय मिळतो की नाही याकडे संपूर्ण कल्याण तालुक्यासह सोलापूर कामगारांचे लक्ष लागले आहे.

No comments:

Post a Comment

जी.के.एस.कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवली तर्फे संशोधन पद्धती व वैज्ञानिक लेखनावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न !

जी.के.एस.कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवली  तर्फे संशोधन पद्धती व वैज्ञानिक लेखनावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न ! मुंबई (शा...