पोलीस कर्मचाऱ्यांची पत्नी आणि मुलीने मिळून केली हत्या !!
'मुलगी नांदायला जात नाही या कारणाने होत होते कौटुंबिक वाद'
कल्याण, हेमंत रोकडे : कल्याण कोळशेवाडी मधील नाना पावसे परिसरातील एका पोलीस कर्मचार्याची हत्या पत्नी आणि मुलीने मिळून केली हत्या, कल्याण कोळसेवाडी परिसरातील नाना पावशे परिसरात राहणारे पोलीस कर्मचारी प्रकाश बोरशे यांची काल त्यांच्या पत्नी आणि मुलीने डोक्यात खलबत्याच्या बत्याने डोक्यात मारून हत्या केल्याची खळबळ जनक घटना घडली आहे.
बोरसे हे कुर्ला येथील पोलीस ठाण्यात कार्यरत असून त्यांची मुलगी भाग्यश्री पवार ही नांदायला जात नसल्याने त्यांचे वारंवार कौटुंबिक वाद होत होते.
मुलगी नांदायला जात नाही या वादातून पत्नी ज्योती आणि मुलगी भाग्यश्री या मायलेकीने मिळून प्रकाश बोरसे यांची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.


No comments:
Post a Comment