व्हेल माशाच्या उलटीची तस्करी करणाऱ्या तिघांना अटक, तब्बल पाच कोटी ९० हजारांचा मुद्देमाल हस्तगत !!
भिवंडी, दिं,11, अरुण पाटील (कोपर) :
व्हेल माशाची उलटी विकणाऱ्या तिघा जणांना रायगडच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने १० जानेवारी रोजी राजी उशिरा अटक केली. पोलिसांनी तब्बल पाच किलो वजनाची आणि पाच कोटी ९० हजार रुपये किंमतची व्हेल माशाची उल्टी जप्त केली.
व्हेल माशाची उलटी विकणाऱ्या तिघा जणांना रायगडच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने १० जानेवारी 2022 रोजी उशिरा अटक केली. पोलिसांनी तब्बल पाच किलो वजनाची आणि पाच कोटी ९० हजार रुपये किंमतची व्हेल माशाची उल्टी, सुगंधी पावडर,दोन मोटार सायकली जप्त केल्या आहेत.
या प्रकरणी पोलिसांनी दर्पण रमेश गुंड (३९, मजगाव,मुरुड),नंदकुमार खंडू थोरवे (४१ नांदगाव, मुरुड) आणि राजेंद्र जनार्दन ठाकूर (५०,मजगाव) यांचा समावेश आहे. त्यांच्यावर मुरुड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

No comments:
Post a Comment