पौष पौर्णिमा, शांकभरी पौर्णिमेनिमित्त काळेश्वरी मंदिर अन्नदान छत्र वारजे माळवाडी, पुणे तर्फे गोर-गरीब जनतेसाठी अन्नदान !!
पुणे, (केतन भोज) : पौष पौर्णिमा, शांकभरी पौर्णिमेनिमित्त काळेश्वरी मंदिर अन्नदान छत्र वारजे माळवाडी, पुणे येथे मंदिरातील देवीला सर्व भाज्यांची आरास करून देवीला शांकभरी देवीचे स्वरूप देण्यात आले होते.
दुसऱ्या दिवशी त्या सर्व भाज्या वाया जाऊन खराब होऊ नये अथवा फेकून द्याव्या लागू नये या हेतूने गुरुवर्य क्रिष्णल (सोनुगुरु) तागुंदे व गुरुवर्य मच्छिंद्र महाराज वाळंज यांच्या यथाशक्तीने भक्तीचा प्रसाद म्हणून त्या सर्व भाज्या एकत्र शिजवून तसेच त्यासोबत भात व चपाती असा प्रसाद करून गोर-गरिबांना भुकेल्यांच्या मुखी देवी भगवतीचा प्रसाद लागावा म्हणून अन्नदान करण्यात आले.
तसेच काळेश्वरी मंदिर अन्नदान छत्र वारजे माळवाडी, पुणे गुरुवर्य क्रिष्णल (सोनुगुरु) तागुंदे व गुरुवर्य मच्छिंद्र महाराज वाळंज यांनी कोरोना सारख्या कठीण काळात देखील गोर-गरीबांसाठी अन्नदान तसेच त्यांच्यासाठी विविध उपक्रम हाती घेतले होते आणि यापुढे देखील ते देवी भगवतीच्या कृपेने अशीच गोर-गरीब जनतेची सेवा करणार असल्याचा संकल्प केला आहे.




No comments:
Post a Comment