आमदार दिलीप लांडे यांच्या प्रयत्नातून पवई तलाव साफसफाई कामाचा शुभारंभ !!
मुंबई, (शांताराम गुडेकर) :
शिवसेना चांदिवली विधानसभा आमदार दिलीप लांडे यांच्या प्रयात्नांतून चांदीवलीमधील नागरिकांचे धार्मिक स्थळ असलेला पवई तलाव हा साफसफाई करण्याच्या कामाचा शुभारंभ स्थानिक नागरिकांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. पवई तलावातील जलपर्णी वनस्पती तांत्रिक पद्धतीने साफसफाई करण्यात येणार आहे. पवई तलावावर मोठ्या प्रमाणावर गणेश मूर्ती विसर्जन. दुर्गा माता मूर्ती विसर्जन, छटपूजा असे विविध धार्मिक कार्यक्रम होत असतात. पवई तलाव हा एक निसर्गरम्य परिसर असून ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पर्यटक येत असतात. त्यामुळे तलावाचे सुशोभीकरण करून निसर्गाचा अमूल्य ठेवा जपणे आवश्यक आहे. ह्या तलावातील जलपर्णी वनस्पती साफसफाई व तलावा शेजारी बगीचा, जेष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस आदी विविध प्रकारच्या सोयी सुविधा पुरविण्यात येणार असून मुंबई शहराच्या सौंदर्यात भर पडून पर्यटनाला चालना मिळेल. दरम्यान यावेळी आमदार दिलीप लांडे यांच्यासह उपविभाग प्रमुख अशोक माटेकर, नगरसेविका चंद्रावती मोरे, माजी नगरसेवक ईश्वर तायडे शाखाप्रमुख सचिन मदने, नितीन गोखले, तसेच शिवाजी सूर्यवंशी आदी स्थानिक नागरिक उपस्थित होते.

No comments:
Post a Comment