झेडपी सदस्यां जयश्री सासे यांनी आपटी रस्त्याच्या बातमीची घेतली दखल 'प्रश्न सोडवण्यासाठी घेतला पुढाकार !
कल्याण, (संजय कांबळे) : कल्याण तालुक्यातील 'आपटी गावाच्या ग्रामस्थांना पोटाची खळगी भरण्यासाठी करावा लागतो जीवघेणा प्रवास' अशा मथळ्याखाली पत्रकार संजय कांबळे यांनी विविध दैनिकातून व इलेक्ट्रॉनिक मिडियातून बातमी प्रसिद्ध करताच ठाणे जिल्हा परिषदेच्या सदस्यां श्रीमती जयश्री सासे यांनी याची दखल घेऊन आज सकाळी या परिसराचा पाहणी दौरा करून हा प्रश्न आपण येत्या झेडपीच्या सर्व साधारण सभेत मांडणार असल्याचे सांगून ग्रामस्थांची ही अडचण सोडवण्यासाठी आपण पुढाकार घेणार असल्याचे ही त्यांनी सांगितले.
कल्याण नगर आणि टिटवाळा बदलापूर या महामार्गापासून अगदी हाकेच्या अंतरावर उल्हास नदीच्या काठावर आपटी हे शेतीप्रधान गाव वसलेले आहे. पांरपारिक पद्धतीने शेती होत असल्याने अनेक तरुण बेरोजगार आहेत, परंतु येथून जवळच म्हणजे उल्हास नदीच्या पलिकडे, आंनदनगर एमआयडीसी, बदलापूर, अशी औद्योगिक क्षेत्र असल्याने येथील तरुणांना काही प्रमाणात रोजगार मिळाला होता.
ते नदीच्या बंधाऱ्याच्या खाली असलेल्या दिड फुटांच्या रस्त्यावरुन कामधंदा व नोकरी साठी तिकडे ये जा करीत होते. कोरोनामुळे काहीच्या नोक-या गेल्या, तर मागील वर्षी पुरामुळे हा रस्ता वाहून गेल्याने जाणेयेणे बंद झाल्याने इतरांच्या नोकरी जाणाच्या मार्गावर होत्या, त्यामुळे पोटाची खळगी भरण्यासाठी गावातील तरुण, वयोवृद्ध, महिला, पुरुष, लहान मुले जीव धोक्यात घालून एका लोंखडी अँगल वरुन ये जा करित होते, परंतु याकडे लोकप्रतिनिधी, प्रशासन, नेते, पुढारी यांना लक्ष द्यायला वेळ नव्हता,
त्यामुळे पत्रकार संजय कांबळे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन, ग्रामस्थांशी बोलून तशी सचित्र बातमी विविध दैनिकात तसेच इलेक्ट्रॉनिक मिडिया मध्ये प्रसिध्द केली. बातमी प्रसिद्ध होताच या भागातील ठाणे जिल्हा परिषदेच्या सदस्यां जयश्री सासे यांनी आज सकाळी संबंधित ठिकाणी भेट दिली, यावेळी आपण या संदर्भात एमआयडीसी च्या अधिका-याशी पत्रव्यवहार केला असून, पुर्वी हे काम आपणच केले असल्याचे सांगितले. तसेच प्रंचड पुरामुळे ते वाहून गेले आहे, त्यामुळे आपटी ग्रामस्थांची गैरसोय होते आहे, त्यामुळे हा प्रश्न आपण येत्या ठाणे जिल्हा परिषदेच्या सर्व साधारण सभेत मांडणार असल्याचे सांगितले. तसा पुढाकार घेणार आहे, असेही सांगितले.
दरम्यान याच बातमीची दखल राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्वीयसहाय्यक, श्री ढिकले यांनी घेतली असून, त्यांनी ताबडतोब ठाणे जिल्हाधिकारी यांना लक्ष घालण्या सांगितले आहे. त्यामुळे हा प्रश्न जगासमोर आणल्या बदल संपूर्ण तालुक्यातून पत्रकार संजय कांबळे यांचे अभिनंदन होत आहे.
तथापि आजच्या झेडपी सदस्यां जयश्री सासे यांच्या पाहणी दौऱ्याप्रंसगी वसत ग्रामपंचायतीचे सरपंच मधू राणे, आपटीचे ग्रामसेवक नितीन चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते महेंद्र म्हसकर, वसंत शिसवे, पोलीस पाटील, शत्रुघ्न शिसवे, ग्रामपंचायत सदस्य, मोहन शिसवे, करूणा भेरले, आदी मंडळी उपस्थित होते.





No comments:
Post a Comment