Monday, 10 January 2022

कारवाईदरम्यान सहाय्यक आयुक्तांच्या पथकावर हल्ला !! "कल्याण एपीएमसी मार्केटमधील धक्कादायक प्रकार"

कारवाईदरम्यान सहाय्यक आयुक्तांच्या पथकावर हल्ला !! "कल्याण एपीएमसी मार्केटमधील धक्कादायक प्रकार"


कल्याण, बातमीदार : कल्याणमध्ये प्लास्टिक पिशव्यांवर कारवाई गलेल्या सहाय्यक आयुक्त व त्यांच्या पथकावर एपीएमसी मार्केटमधील व्यापाऱ्यांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर अली आहे. लाईट बंद करत शिवीगाळ करत पथकाला कांदे फेकून मारल्याची घटना घडली आहे. 

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात महापालिकेकडून प्लास्टिक बंदीबाबत ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर आज सहाय्यक आयुक्त सुधीर मोकल आपल्या पथकासह पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास एपीएमसी मार्केटमध्ये प्लास्टिक पिशव्यांवर कारवाई करण्यास गेले. कारवाईदरम्यान मार्केटमधील व्यापाऱ्यांनी सहाय्यक आयुक्त मोकल आणि त्यांचे पथकाशी वाद घालण्यास सुरुवात केली. काही क्षणातच व्यापाऱ्यांनी मार्केटमधील लाईट बंद करून या पथकाला शिवीगाळ करत त्यांना कांदे फेकून मारले. व्यापाऱ्यांची वाढती गर्दी पाहता पथकाने तेथून काढता पाय घेतला.    

याबाबत पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करणार असल्याचे सहायक आयुक्त सुधीर मोकल यांनी सांगितलं.  

No comments:

Post a Comment

साई मंदिरचे शिस्तबद्ध व्यवस्थापन : महेंद्रशेठ घरत.

्साई मंदिरचे शिस्तबद्ध व्यवस्थापन : महेंद्रशेठ घरत. निष्ठा पाटील हिचा साई मंदिर वहाळतर्फे सत्कार उरण दि १५, (विठ्ठल ममताबादे) : ...