कल्याण पूर्वेतील एटीएम सेंटरला भीषण आग !!
कल्याण, बातमीदार : कल्याण पूर्वमधील कैलासनगर आंबेडकर चौकात असणाऱ्या बँकेच्या एटीएमला आग लागल्याची घटना सोमवारी (ता. १०) पहाटे घडली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली.मात्र तोपर्यंत संपूर्ण एटीएम जळून खाक झाले होते. आगीचे कारण अस्पष्ट असून, एटीएममध्ये किती रक्कम होती, याबाबतची माहिती मिळू शकली नाही. या घटनेत जीवितहानी झाली नसली तरी एटीएमचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
आग लागली तेव्हा एटीएममध्ये किती पैसे होते, याची माहिती मिळू शकलेली नाही त्याच बरोबर या आगीचं नेमकं कारण समजू शकलं नाही. ही आग लागली की लावण्यात आली ? याचाही सध्या तपास सुरु आहे.

No comments:
Post a Comment