Friday, 4 February 2022

संतोष परब हल्ला प्रकरणी नितेश राणे यांना 18 फेब्रुवारी पर्यंत न्यायालयीन कोठडी !!

संतोष परब हल्ला प्रकरणी नितेश राणे यांना  18 फेब्रुवारी पर्यंत  न्यायालयीन कोठडी !!


भिवंडी, दिं,4, अरुण पाटील, (कोपर) : संतोष परब हल्लाप्रकरणी दोन दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आलेल्या आमदार नितेश राणे यांना कोर्टात हजर करण्यात आले. दोन दिवसांची पोलीस कोठडी आज संपत असल्याने पुढील प्रक्रियेसाठी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांच्या सोबत त्यांचे खासगी सचिव राकेश परब यांनाही हजर करण्यात आले. या दोघांनाही कणकवली न्यायालयाने 14 दिवसाची म्हणजेच18 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन  कोठडी सुनावली आहे. 

दरम्यान, आमदार नितेश राणे यांच्यावतीने जिल्हा न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात येणार आहे. त्याची सुनावणी नेमकी कधी होते, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. 

असा झाला युक्तीवाद -सरकारी पक्षाकडून नितेश राणे यांच्या वाढीव पोलीस कोठडीची मागणी केली जात होती. नितेश राणे यांनी फिर्यादी संतोष परब यांचा फोटो सचिन सातपुतेला आपल्या मोबाईलवरून पाठवला. पण आरोपी नितेश राणे नाही म्हणत आहेत. 

त्यामुळे अजून 2 दिवसांची पोलीस कस्टडी पाहिजे, असा युक्तीवाद सरकारी वकिलांनी न्यायालयाला केला. तर नितेश राणे यांचे वकील सतीश मानेशिंदे यांनी आपल्या युक्तिवादात म्हटले की, दोन दिवस पोलीस कोठडी दिली होती. त्यात काहीच तपास झाला नाही. आम्ही सहकार्य केलं होतं. त्यामुळे आता पोलीस कोठडीची गरज नाही. 

खासगी सचिवांसह नितेश राणेंना न्यायालयीन कोठडी -दरम्यान, न्यायालयाने आमदार नितेश राणे आणि त्यांचे खासगी सचिव राकेश परब या दोघांनाही 18 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आमदार नितेश राणे आणि राकेश यांच्या वतीने जिल्हा न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात येणार आहे. या अर्जावर नेमकी सुनावणी कधी होते आणि या दोघांचीही जामीनावर कधी मुक्तता होते, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

No comments:

Post a Comment

भारतीय वैदिक विज्ञान संशोधन संस्था, मुंबई आयोजित "कर्तृत्ववान महिला सन्मान" कार्यक्रम उत्साहात संपन्न !!

भारतीय वैदिक विज्ञान संशोधन संस्था, मुंबई आयोजित "कर्तृत्ववान महिला सन्मान" कार्यक्रम उत्साहात संपन्न !! मुंबई, (पी. ड...