Friday, 4 February 2022

मुरबाड तालुक्यातील खापरी गावचे सुपुत्र विनायक नामदेव गोल्हे यांना पोलीस निरीक्षक पदी पदोन्नती !

मुरबाड तालुक्यातील खापरी गावचे सुपुत्र विनायक नामदेव गोल्हे यांना पोलीस निरीक्षक पदी पदोन्नती ! 


कल्याण, (संजय कांबळे) : जिद्द, चिकाटी, कष्ट करण्याची भयंकर तयारी, आणि यशस्वी होणार च असा प्रंचड आत्मविश्वास, महत्त्वकांक्षा यांच्या जोरावर मुरबाड सारख्या अत्यंत मागासलेल्या अश्या खापरी गावातील तरुणाने गरुडझेप घेतली असून ते पोलीस निरीक्षक या पदावर पोहचले आहेत. त्यामुळे त्यांच्या वर अभिनंदन व कौतुकाचा वर्षाव होत आहे. त्यांचे नाव आहे विनायक नामदेव गोल्हे.


शेतकरी कुटुंबात जन्मघेतलेल्या विनायक यांचे, आई वडील अल्प शिक्षित, खापरी गाव, पोस्ट टोकावडे, ता. मुरबाड, शालेय शिक्षण, 7 वी पर्यंतचे- खापरी गावातच झाले. 10वी पर्यंत - शारदा विद्यालय टोकावडे, 12 विं पर्यंत - पद्मश्री अण्णासाहेब जाधव ज्युनिअर कॉलेज भिवंडी, अर्थशास्त्र विषयात पदवी -BA अगरवाल कॉलेज कल्याण, MA- अर्थशास्त्र - पुणे विद्यापीठ


पहिलीपासून - महाविद्यालयिन शिक्षणात 'दरवर्षी प्रथम क्रमांकानेच उत्तीर्ण' हे त्यांचे वैशिष्ठ. घरची गरिबी व हलाखीची परिस्थिति असतानाही जिद्द, चिकाटी व नियोजन पूर्ण अभ्यास करून प्रथम प्रयत्नातच


MPSC परीक्षा 2006 उत्तीर्ण होवून पोलीस उपनिरीक्षक (PSI)पदी निवड, 2014 साली सहायक पोलिस निरीक्षक पदी पदोन्नती 


शिक्षण - MA अर्थशात्र, LLB, LLM ,त्याच बरोबर Diploma in cyber crime & security. आतापर्यंत सेवा बजावली आहे. शिवाय मुंबई शहर, सीबीआय आर्थिक गुन्हे शाखा, पुणे त्याच बरोबर राज्य गुप्तचर विभाग, CID, कल्याण पथक येथे कर्तव्य केले आहे.


सामाजिक बांधिलकी म्हणून *दीपस्तंभ* नावाचा WhatsApp group तयार करून  मुरबाड, शहापूर, कल्याण, कर्जत इ. तालुक्यातील होतकरू मुला - मुलींना स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यास मार्गदर्शन व प्रेरणा देण्याचे कार्य करून पोलीस भरती, सैन्य भरती बँक, पोस्ट भरती, MPSC, staff selection इ. स्पर्धा परीक्षेतून ग्रामीण भागातील होतकरू विद्यार्थी यांना यशस्वी होण्यासाठी प्रयत्न  व मार्गदर्शन करत आहेत. 


त्याच बरोबर संघर्ष पोलीस अकॅडमी किन्हवली, येथे  पोलीस भरती चे  विध्यार्द्यांना मोफत मार्गदर्शक म्हणून कार्य करून सामाजिक बांधिलकी जपण्याचे कार्य करत आहेत. तसेच गरीब व गरजू विद्या्थ्यांसाठी स्वखर्चाने शैक्षणिक मदत करण्याचे काम करत असतात.


त्याच बरोबर आपण ज्या समाजात जन्मलो त्याचे ऋण म्हणून मुरबाड व कल्याण तालुक्यातील कुणबी समाजाच्या  मंडळात सक्रिय सहभाग घेवून विविध उपक्रमात भाग घेत असतात.

सद्रक्षणाय खलनिग्रनाय या पोलीस खात्यातील कर्तव्याबरोबरच त्यांना वाचनाची तसेच शेतीची व, झाडांची सुद्धा खूप आवड आहे. सुट्टीच्या दिवशी ते स्वतःच्या शेतात, झाडांची काळजी घेताना व राबताना दिसतात.

तसे पाहिले तर मुरबाड, शहापूर, कल्याण या तालुक्याचा विचार केला तर या परिसरातून अधिकारी म्हणून सेवेत असणारे खूपच कमी लोक आहेत त्यामध्ये गोल्हे यांचा अग्रक्रंम लागतो.

अशा या सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेले व स्वतःची जिद्द, चिकाटी व अथक परिश्रमातून परिस्थितीवर मात करून  MPSC सारखी परीक्षा उत्तीर्ण होवून आज वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदावर पदोन्नती प्राप्त झालेल्या , कर्तव्य निष्ट, समाज निष्ठ,  मुरबाड तालुक्यातील खापरी  गावचे सुपुत्र  विनायक गोल्हे यांना  पुढील यशस्वी वाटचालीस मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा..

संजय कांबळे :-
+91 95617 79905

No comments:

Post a Comment

भारतीय वैदिक विज्ञान संशोधन संस्था, मुंबई आयोजित "कर्तृत्ववान महिला सन्मान" कार्यक्रम उत्साहात संपन्न !!

भारतीय वैदिक विज्ञान संशोधन संस्था, मुंबई आयोजित "कर्तृत्ववान महिला सन्मान" कार्यक्रम उत्साहात संपन्न !! मुंबई, (पी. ड...