Saturday, 5 February 2022

रायते विभाग हायस्कूलचे समुपदेशक कल्पेश शिंदे यांची महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, मुंबई विभागीय परीक्षा मंडळावर 'समन्वयक' म्हणून निवड !!

रायते विभाग हायस्कूलचे समुपदेशक कल्पेश शिंदे यांची महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, मुंबई विभागीय परीक्षा मंडळावर 'समन्वयक' म्हणून निवड !!


कल्याण, (संजय कांबळे) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, मुंबई विभागीय परीक्षा मंडळ वाशी नवी मुंबई येथे पदमश्री अण्णासाहेब जाधव भारतीय समाज उन्नती मंडळ भिवंडी संचालित रायते विभाग हायस्कूल रायते या विद्यालयातील शिक्षक समुपदेशक व वाडा तालुक्यातील बिलघर गावचे सुपुत्र  कल्पेश मनोहर शिंदे यांची 'समन्वयक' म्हणून निवड करण्यात आली आहे, त्यामुळे त्यामुळे त्यांचे स्तरातून अभिनंदन होत आहे.


मार्च- एप्रिल 2022च्या माध्यमिक शालांत व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा 4/3/2022 ते 4/4/2022 पर्यंतच्या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या आहेत, सदर परीक्षांसाठी पोषक वातावरण निर्माण करणे व विद्यार्थी, पालक यांच्या मनातील परीक्षा संदर्भातील संभ्रम दूर करणे आणि विद्यार्थी पालकांच्या प्राप्त दूरध्वनीवरून त्यांना या संदर्भात त्यांना मार्गदर्शन व समुपदेशनासाठी श्री कल्पेश शिंदे सरांची समन्वयक/समुपदेशक म्हणून निवड करण्यात आली आहे, सरांनी विविध क्षेत्रात आपल्या स्वकर्तृत्वाच्या लीलया दाखवुन अंत्यत चांगले काम करून त्यांनी नावलौकिक मिळवला आहे त्यामुळे रायते विभाग हायस्कूल या शाळेच आणि बिलघर गावाचं नाव रोशन करून मानाचा तुरा रोवला आहे.

सरांची अभुतपुर्व, अद्वितीय व अविस्मरणीय समन्वयक म्हणून निवड झाल्याबद्दल विद्यालयाचे प्राचार्य श्री सी एस पाटील सर आणि सर्व विद्यार्थ्यांसह, पंचक्रोशितील पालकांनी त्यांचं अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत. हेच पवित्र कार्य करण्यासाठी सरांना बळ आणि शक्ती देवो, आणि उदंड आयुष्य मिळू दे अशी प्रार्थना रायते विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी केली आहे. तर ही निवड कल्याण तालुक्यासाठी गौरवास्पद आहे असे पालक व पत्रकार संजय काबळे यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

भारतीय वैदिक विज्ञान संशोधन संस्था, मुंबई आयोजित "कर्तृत्ववान महिला सन्मान" कार्यक्रम उत्साहात संपन्न !!

भारतीय वैदिक विज्ञान संशोधन संस्था, मुंबई आयोजित "कर्तृत्ववान महिला सन्मान" कार्यक्रम उत्साहात संपन्न !! मुंबई, (पी. ड...