Tuesday, 1 February 2022

भिवंडीत इको कारमध्ये सापडला स्फ़ोटकांचा मोठा साठा !!

भिवंडीत इको कारमध्ये सापडला स्फ़ोटकांचा मोठा साठा !!


भिवंडी, दिं,02, अरुण पाटील (कोपर) :
भिवंडी तालूक्यात मोठ्या प्रमाणावर दगड खाणी असल्या कारणाने या परिसरात कायदेशीर व  बेकायदेशीररित्या सुरुंग स्फ़ोटासाठी जिलेटीन व डिटोनेटरचा वापर केला जात आहे. या पूर्वी देखील कारिवली गावात अशाच प्रकारे जिलेटीन व डिटोनेट रचा साठा जप्त केला होता. अशाच प्रकारे पुन्हा भिवंडीमध्ये एका इको कारमध्ये मोठ्या प्रमाणात जिलेटीन व डिटोनेटरचा स्फोटक साठा  सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे.
                तब्बल 1 हजार जिलेटीन आणि डिटोनेटर  जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  भिवंडीतील निजामपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नदीनाका इथं ही कारवाई करण्यात आली आहे.
               अल्पेश पाटील, पंकज चव्हाण, समीर वेडगा अशी अटक केलेल्या आरोपीची नावे आहे. पोलिसांनी या तिन्ही आरोपींकडून 1 हजार जिलेटीन नग, 1 हजार डीटोनेटर नग आणि इको कार जप्त केली आहे. पोलिसांनी सुमारे साडेचार लाख रुपयांचे स्फोटक सामुग्री जप्त केली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात स्फोटकांचा साठा जप्त करण्यात आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
           भिवंडी गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकानेही कारवाई केली आहे. या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात स्फोटकं कुणी आणली, या मागे कुणाचा काय हेतू आहे, याचा पोलीस तपास करत आहेत.

No comments:

Post a Comment

नगरसेविका सौ. पायल किशोर सौरखादे यांच्या पुढाकाराने रस्त्याचे काम पूर्ण !!

नगरसेविका सौ. पायल किशोर सौरखादे यांच्या पुढाकाराने रस्त्याचे काम पूर्ण !! ** नागरिकांकडून जाहीर कौतुक अंबरनाथ, विशाल कुरकुटे : ...