Thursday, 3 February 2022

गोगटे-जोगळेकर महाविदयालयाच्या हर्ष कांबळे ला भित्तिपत्रक स्पर्धेत उत्तेजनार्थ पारितोषिक !!

गोगटे-जोगळेकर महाविदयालयाच्या हर्ष कांबळे ला भित्तिपत्रक स्पर्धेत उत्तेजनार्थ पारितोषिक !!
 

मुंबई, बातमीदार: मुंबई विदयापीठाच्या ५४ व्या आंतर महाविदयालयीन युवा महोत्सवामध्ये गोगटे-जोगळेकर महाविदयालयाच्या हर्ष कांबळे भित्तीपत्रके स्पर्धेत मुंबई विदयापीठात उत्तेजनार्थ क्रमांक प्राप्त केला आहे. ह्यासाठी सांस्कृतिक विभागप्रमुख प्राध्यापक डॉ. आनंद आंबेकर आणि प्राध्यापक शुभम पांचाळ यांनी मार्गदर्शन केले होते. तसेच प्रसाद साळवी ह्याने सहकार्य केले आहे.

स्पर्धेसाठी योगांचे फायदे हया विषयावर अत्यंत आकर्षक आणि प्रबोधनात्मक असे पोस्टर बनविले आहे. रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी कार्याध्यक्षा श्रीमती शिल्पाताई पटवर्धन, कार्यवाह सतीश शेवडे प्रभारी प्राचार्य डॉ. प्रफुलदत्त कुलकर्णी, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. मकरंद साखळकर कला शाखेचे उपप्राचार्य डॉ.सुरेंद्र ठाकूरदेसाई वाणिज्य विभागाच्या उपप्राचार्य डॉ. यास्मीन आवटे विज्ञान शाखेच्या उपप्राचार्य डॉ. अपर्णा कुलकर्णी या सर्वांनी हर्ष कांबळे आणि सांस्कृतिक विभागाचे अभिनंदन केले आहे.


No comments:

Post a Comment

दि मॉडेल इंग्लिश स्कूल सैतवडे शाळेस ५५ इंची दोन स्मार्ट टेलीव्हिजन संच भेट !

दि मॉडेल इंग्लिश स्कूल सैतवडे शाळेस ५५ इंची दोन स्मार्ट टेलीव्हिजन संच भेट ! सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुल सैतवडे येथील प्...