Tuesday, 22 February 2022

ठाण्यात पाईपलाईन फुटल्याने लाखो लिटर पाणी गेले वाया !!

ठाण्यात पाईपलाईन फुटल्याने लाखो लिटर पाणी गेले वाया !!


भिवंडी दिं,२१, अरुण पाटील( कोपर) :
         ठाण्यातील माजिवडा परिसरात पाण्याची पाईप लाईन फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले आहे. एकीकडे ठाणे शहराला पाण्याची टंचाई भासत असतांना लाखो लिटर पाणी वाया गेले आहे. त्यामुळे आता आज तरी पाण्याची काटकसर करण्याची वेळ मीरा - भायंदरच्या नागरिकांनवर ओढवली आहे. पाईप लाईन फुटल्याने संपूर्ण रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.        
              रस्त्यावरून जाणाऱ्या टँकरच्या धडक दिल्याने पाईप लाईन फुटल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तर ही पाईपलाईन मिरा भाईंदर महानगरपालिकेची असून, या ठिकाणी आता ठाणे महानगरपालिकेची आपत्ती व्यवस्थापन टीम पोहचली असून पाईप लाईन दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरु  आहे.

No comments:

Post a Comment

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !!

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !! उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : ...