Monday 28 February 2022

असंघटीत क्षेत्रातील कामगारांसाठी कुणबी समाजोन्नती संघ मुंबई (रजि.) शाखा विक्रोळी -घाटकोपर तर्फे ई-श्रम कार्ड शिबीर संपन्न !!

असंघटीत क्षेत्रातील कामगारांसाठी कुणबी समाजोन्नती संघ मुंबई (रजि.) शाखा विक्रोळी -घाटकोपर तर्फे  ई-श्रम कार्ड शिबीर संपन्न !!


मुंबई, (शांताराम गुडेकर) :

             सरकारच्या योजनांचा फायदा थेट असंघटीत क्षेत्रातील कामगारांना मिळण्यासाठी केंद्र सरकारकडून ई-श्रम कार्ड ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. देशात या क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांची संख्या मोठी आहे. यात स्थलांतरीत होणाऱ्या  कामगारांचा मोठा समावेश आहे. 


अशा कामगारांना केंद्र सरकारकडून काही सुविधा देण्यात येत आहे. तसेच भविष्यात देखील काही सेवा देण्याचा सरकारचा विचार आहे. यासाठी अशा कामगारांचा डेटाबेस तयार करण्याचे काम केंद्र सरकार करत आहे. याचा फायदा सर्व सामान्यांना मिळावा या हेतूने असंघटीत क्षेत्रातील कामगारांसाठी कुणबी समाजोन्नती संघ मुंबई (रजि.) शाखा विक्रोळी -घाटकोपर तर्फे दि. २७ फेब्रुवारी २०२२ रोजी संत तुकाराम बालवाडी, डगलाईन, राम नगर अ, घाटकोपर पश्चिम येथे ई-श्रम कार्ड शिबीर पार पडले. 


या शिबीरचा ८० लोकांनी लाभ घेतला. महिला अध्यक्षा सौ. अश्वीनी आत्माराम बाईत यांच्या अध्यक्षतेखाली हे शिबीर संपन्न झाले. शिबीर यशस्वी करण्यासाठी सौ. शितल मांडवकर, सौ. शुभांगी  घाग, सौ. अंजली थोरे, सौ. सुप्रिया जाधव, सौ. संजना कोळंबे, श्रीमती अक्षता जागडे, कुमारी रिंकल नरेश येलमकर, कुमारी श्रद्धा अजित आंग्रे, कार्यालय प्रमुख अनंत खामकर आणि सर्व विद्यमान शाखा पदाधिकारी, सदस्य व सभासद, आजी - माजी पदाधिकारी, सदस्य, सभासद आणि महिला मंडळ पदाधिकारी, सदस्य व सभासद तसेच युवक मंडळ पदाधिकारी, सदस्य व सभासद, विवाह मंडळ पदाधिकारी, सदस्य व सभासद तसेच हितचिंतक यांनी विशेष मोलाचे सहकार्य केले. 


सरकार दरवर्षी अर्थसंकल्पात गरींबासाठी योजनांची घोषणा करत असते. मागील वर्षीच्या अर्थसंकल्पात सरकारने ई-श्रम कार्डची घोषणा केली होती. हे कार्ड बनविण्याची प्रत्यक्षात सुरूवात २६ ऑगस्ट २०२१ मध्ये झाली. यासाठी सरकारकडून व्यापक मोहीम देखील सुरू करण्यात आली आहे. असंघटीत क्षेत्रातील कामगारांसाठी या योजनेची सुरूवात सरकारकडून करण्यात आली. या कार्डाच्या माध्यमातून कामगार सरकारी योजनांचा लाभ घेवू शकतात. या सध्या सुरू असणाऱ्या आणि भविष्यातील योजनांचा यात समावेश असेल. पोर्टलवर नांदेणी केल्यानंतर बारा अंकाचा एक युनिक नंबर देण्यात येतो. नोंदणी केलेल्यांना दोन लाखाच्या अपघात विम्याची सोय सरकारकडून करण्यात येते.


No comments:

Post a Comment

भिवंडी लोकसभा मतदारसंघात माझा विजय निश्चित - भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) काल महाविकास आघाडीच्या मतदारसंघा...