Friday 25 February 2022

पोलीस उपनिरीक्षक सुनिता भोसले यांचे विद्यार्थ्यांना स्वसंरक्षणाचे धडे !

पोलीस उपनिरीक्षक सुनिता भोसले यांचे विद्यार्थ्यांना स्वसंरक्षणाचे धडे !


मुंबई, संदीप शेंडगे : साकीनाका पोलीस ठाणे हद्दीतील महेश्वरी इंग्लिश मिडीयम स्कूल चांदिवली साकीनाका मुंबई या ठिकाणी निर्भया पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक सुनिता भोसले व म पो ना बोऱ्हाडे यांनी  विद्यार्थ्यांना स्वसंरक्षणाचे धडे दिले. शाळेमध्ये इयत्ता ४ थी ते ९ वी च्या एकूण ७९ विद्यार्थिनी व ८ शिक्षक उपस्थित होते. उपस्थित विद्यार्थिनी व शिक्षक यांना निर्भया पथका विषयी त्याचे उद्देश समजावून सांगून त्यांना सविस्तर माहिती दिली. तसेच त्यांना चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श कसा ओळखायचा तसेच आपली सुरक्षा कशी करायची या बाबत सविस्तर प्रात्यक्षिक करून माहिती दिली.        


सायबर क्राईमसंदर्भात इंटरनेट चे फायदे व दुरुपयोग याची माहिती दिली. लहान मुलांसाठी असलेल्या पोक्सो कायदा यांची माहिती करून दिली. तसेच निर्भया पथकाची ओळख करून त्यांना निर्भया पथकाचा मोबाईल नंबर व  निर्भया पथकाचे अधिकारी व अंमलदार यांचे फोन नंबर देण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना बोलते करून त्यांच्या मनातील पोलीसांबददल असणारी भीती कमी करण्यासाठी विद्यार्थ्यांसोबत जवळीक साधली त्यांना येणाऱ्या समस्या जाणून घेतल्या त्याच्यावर त्यांना उपाय सांगण्यात आले. आत्मसुरक्षा प्रात्यक्षिक देण्यात आले व विद्यार्थ्यांकडून करवून घेतले. 


तसेच शिक्षक यांच्या समस्यावर चर्चा करून त्यांना योग्य ते मार्गदर्शन करण्यात आले. साकीनाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बळवंत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

No comments:

Post a Comment

भिवंडी लोकसभा मतदारसंघात माझा विजय निश्चित - भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) काल महाविकास आघाडीच्या मतदारसंघा...